कोल्हापूर

मविआ सभा विश्‍लेषण

CD

महाविकास आघाडीने सभेतून दाखवली ताकद
गर्दीचे रूपांतर मतदानात करण्याचे आव्हान ः नेते, कार्यकर्त्यांची एकजूट टिकवावी लागणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमदेवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेतून महाविकास आघाडीची ताकद दिसली. आता या ताकदीचे मतदान करून घेण्याचे आव्‍हान नेत्यांसमोर असेल. या सभेच्या निमित्ताने आघाडीतील तिन्हीही पक्षांतील व कार्यकर्त्यांची एकजूट दिसली. त्यामुळे सभाही ‘ओवरफ्लो’ झाली. अजून चार दिवस ही एकजूट टिकवावी लागणार आहे.
गेल्या आठवड्यात महायुतीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात सभा झाली. त्यालाही प्रतिसाद मिळाला असला तरी त्याच्या तोडीस तोड सभा कालची महाविकास आघाडीची झाली. श्री. मोदी यांची सभा दोन्ही मतदार संघांसाठी, तर ‘मविआ’ची सभा एका उमेदवारासाठी होती, हा या दोन सभांतील फरक म्हणावा लागेल. सभेचे उत्तम नियोजन, कार्यकर्त्यांतील उत्साह, नेत्यांच्या भाषणाला मिळणारा प्रतिसाद आणि शेवटपर्यंत कार्यकर्ते सभेतून हलले नाहीत, ही आणखी काही वैशिष्ट्ये म्हणावी लागतील.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उशिरा आले; पण तोपर्यंत अन्य नेत्यांनी वेगवेगळ्या विषयांवरून सरकारवर केलेल्या टीकेला लोकांनीही दाद दिली. त्यावर श्री. ठाकरे यांनी आपल्या शैलीत भाषण करून कळस चढवला. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या या सभेमुळे महाविकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांना जरूर बळ मिळाले आहे. आता हेच वातावरण टिकवून ठेवण्याचे आणि गर्दीचे रूपांतर मतदानात करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
आतापर्यंतच्या सर्वच राजकीय पक्षांच्या सभेत सभा जशी लांबत जाईल तसा कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होतो. त्यातून मध्येच उठून जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यालाही ही सभा अपवाद ठरली. अगदी श्री. ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतरही कार्यकर्ता जागेवरून हलला नव्हता. या सभेचे मैदान महाविकास आघाडीने मारून वातावरणनिर्मिती केली असली तरी निकालात त्याचे प्रतिबिंब उमटवण्याचे आव्हान असेल.

चौकट
मैदान ‘ओव्हरफ्लो’
या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांची राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची मांदियाळी एकत्र आली. या नेत्यांतील एकजूटही सभेत पाहायला मिळाली. सभेची वेळ चार वाजताची; पण सहा वाजेपर्यंत मैदानात म्हणावी तशी गर्दी नव्हती. त्यानंतर मात्र मैदान ‘ओव्हरफ्लो’ झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT