कोल्हापूर

इचलकरंजीत १४० कुपनलिका कोरड्या

CD

इचलकरंजीत १४० कूपनलिका कोरड्या
आणखी वाढण्याची शक्यता : पाणीटंचाईला सामोरे जाण्याची भीती
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २ ः शहरातील भूमिगत पाण्याची पातळी यंदा खूपच खालावल्याचे समोर येत आहे. या वर्षी तब्बल १४० सार्वजनिक कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. दरवर्षीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. याशिवाय आणखी काही कूपनलिकांचे पाणी कमी होत चालले आहे. अद्याप उन्हाळा संपण्यास किमान महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शहरातील बहुतांशी कूपनलिका कोरड्या पडण्याची भीती आहे. या कूपनलिका नागरिकांसाठी मोठ्या आधार आहेत. त्यामुळे या कूपनलिका ऐन उन्हाळ्यात कूचकामी ठरल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या दोन्ही नदीवरील योजना बेभरवशाच्या आहेत. अशा परिस्‍थितीत शहरातील कूपनलिका आधार ठरत आहेत. विविध पर्यायातून पिण्याच्या पाण्याची सोय होत असली तरी अन्य खर्चासाठी आवश्यक असणारे पाणी हे कूपनलिकातूनच घ्यावे लागते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात या कूपनलिका उपयुक्त ठरत आल्या आहेत. पण गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे शहरातील भूजल पातळी खालावत असल्याचे समोर येत आहे. त्याचे परिणाम आता दिसून येत असून आतापर्यंत शहरातील १४० कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. गेल्यावर्षी एप्रिलअखेर ८० कूपनलिका बंद पडल्या होत्या. तुलनेने यंदा प्रमाण खूपच जास्त असल्याचे समोर येत आहे.
--------
मे अखेर भयावह परिस्थिती
सध्या एक - एक अशा कूपनलिका कोरड्या पडत आहेत. त्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. केवळ सार्वजनिक नव्हे तर अनेक खासगी कूपनलिकांचेही पाणी गेले आहे. मे अखेर किमान आणखी ५० सार्वजनिक कूपनलिका कोरड्या पडण्याची भीती महापालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
---------
रेन वॉटर हार्वेस्‍टिंगकडे दुर्लक्ष
नगरपालिका अस्तित्वात असताना मिळकतीत रेन वॉटर हार्वेस्‍टिंग केल्यास घरफाळ्यात १० टक्के सवलत देण्याचा निर्णय झाला होता. त्याचा काही मिळकतधारकांनी फायदा घेतला होता. मात्र महापालिका झाल्यानंतर त्याबाबतची कार्यवाही बंद असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली. परिणामी, भूजल पातळीत वाढ होण्यासाठी पुन्हा एकदा रेन वॉटर हार्वेस्‍टिंग भर देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
---------
कूपनलिका खोदण्याची ईर्ष्या
शहरात खासगी कूपनलिका आहेतच. पण सार्वजनिक कूपनलिकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राजकीय ईर्ष्येतून कूपनलिका खोदण्‍याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. नागरिकांची सोय होत असली तरी अशा कूपनलिकांतून वाया जाणारे पाणी जास्त आहे. त्यामुळेच भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यासाठी आता काम करण्याची वेळ आली आहे. अन्यथा, यापुढील काळ अधिक कठीण असू शकतो, असेच संकेत सद्यस्‍थितून दिले जात आहेत.
-----------
सदनिकाधारकांचे हाल
शहरातील बहुमजली सदनिकाधारकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. नळाला पाणी वेळी - अवेळी येत आहे. तर दुसरीकडे अनेक बहुमजली सदनिकांच्या ठिकाणी २४ तास कूपनलिकांचे पाणी उपलब्ध आहे. पण या उन्हाळ्यात अशा कूपनलिकाचे पाणी एक तर गेले आहे किंवा कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करताना कसरत होत आहे. अशा ठिकाणी खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
--------
पंधरा वर्षांपूर्वी आमची कूपनलिका खोदली आहे. आठ दिवसांपासून पाणी कमी - कमी होत गेले. तर दोन दिवसांपासून कूपनलिकेचे पूर्ण पाणी गेले आहे. आमच्या परिसरातील कूपनलिकांची अशीच परिस्थिती दिसून येत आहे.
-उमाकांत दाभोळे, नागरिक
---------
गतवर्षीच्या तुलनेने या वर्षी सार्वजनिक कूपनलिका कोरड्या पडत चालल्या आहेत, ही वस्तूस्थिती खरी आहे. अनेक कूपनलिकांचे पाणी कमी होत चालले आहे. त्यामुळे नागरिकांनी कूपनलिकांच्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता आहे.
-सुभाष देशपांडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT