कोल्हापूर

सिद्धीविनायक प्रसादासाठी गोकुळचे तूप

CD

82833
...

`सिद्धिविनायका’च्या प्रसादाला
‘गोकुळ’च्या साजूक तुपाची चव
२५० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करणार; अध्यक्ष डोंगळे यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) गायीच्या दुधाचे तूप आता मुंबई प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरातील प्रसादासाठी वापरले जाणार आहे. गायीच्या दुधाचे तूप घेऊन ‘गोकुळ’चे वाहन आज मुंबईकडे रवाना झाले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करण्यात आले.
गोकुळ शिरगाव येथील ‘गोकुळ’च्या प्रधान कार्यालयात आज हा कार्यक्रम झाला. येत्या आर्थिक वर्षात अडीचशे मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘सिद्धिविनायक मंदिर हे प्रसिध्द मंदिर असून, राज्यासह राज्याबाहेरील लाखो भाविक भेट देतात. त्यांना ट्रस्टमार्फत प्रसाद दिला जातो. या सिद्धिविनायकाच्या प्रसादात ‘गोकुळ’चे तूप वापरले जाणार आहे. हे गोकुळचे मोठे भाग्य आहे. गोकुळ प्रकल्पाची तूप उत्पादनाची क्षमता व त्याची गुणवत्ता उच्चतम असून, उत्तम गुणवत्तेमुळेच गोकुळला हा पुरवठा करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे गोकुळ व सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट यांच्यामध्ये ऋणानुबंध जोडले जातील, यातून गोकुळची मूल्यवृद्धी होण्यास मदत होईल.’
यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग महाव्यवस्थापक जगदीश पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, प्रकाश आडनाईक, हिमांशू कापडिया, लक्ष्मण धनवडे, उपेंद्र चव्हाण, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील व अधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT