कोल्हापूर

कोल्हापूरसह गडहिंग्लज युनायटेडची विजयी सलामी

CD

82854
कोल्हापूर ः छत्रपती शाहू स्टेडियमवर शिवशाहू रायझिंग स्टार्स फुटबॉल स्पर्धेचे उद्‍घाटन यशराजराजे छत्रपती यांनी फुटबॉलला किक मारून केले.
...........
कोल्हापूरसह गडहिंग्लज युनायटेडची विजयी सलामी

शिवशाहू रायझिंग स्टार्स फुटबॉल स्पर्धा ः चौदा, सोळा वर्षांखालील संघांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः शिवशाहू रायझिंग स्टार्स फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरसह गडहिंग्लज युनायटेड स्कूल आदी संघांनी विजयी सलामी देत पहिला दिवस गाजविला. स्पर्धेत चौदा व सोळा वर्षांखालील एकूण १६ संघांनी सहभाग नोंदविला आहे.
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू झालेल्या या स्पर्धेत १६ वर्षांखालील कोल्हापूर (ड) विरुद्ध गडहिंग्लज युनायटेड स्कूल या संघांत पहिला सामना झाला. हा सामना गोलशून्य बरोबरीत राहिला, तर १४ वर्षांखालील गटात गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूल व कोल्हापूर संघात झाला. या सामन्यांत गडहिंग्लजने कोल्हापूर संघाला १-० असे पराभूत केले. गडहिंग्लजच्या अलोक पाटीलने हा निर्णायक गोल केला.
स्पर्धेचे उद्‍घाटन यशराजराजे छत्रपती यांनी फुटबॉलला किक मारून केले. स्पर्धेविषयीची माहिती संयोजक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त शिवाजी पाटील यांनी दिली. यावेळी जयेश कदम, बन्सी चिपडे, डॉ. भरत कोटकर आदी उपस्थित होते. उदय पाटील यांनी स्वागत केले. किरण साळोखे यांनी आभार मानले.
............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT