कोल्हापूर

थकीत पगार सोमवारी होण्याची शक्यता

CD

एसटीच्या कर्मचाऱ्यांचे
थकले एप्रिलचे वेतन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः वेगवेगळ्या सवलतींच्या प्रतिपूर्तीची रक्कम राज्य शासन राज्य परिवहन मार्ग महामंडळाला देते. ती न दिल्याने कोल्हापूर विभागातील ४१०० कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील ८७ हजार कर्मचाऱ्यांचे एप्रिलचे वेतन थकले आहे. दोन दिवस सुटी असल्यामुळे देय रक्कम बँकेत जमा केल्यास हे थकलेले वेतन सोमवारी (ता. १३) होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वेतनच थकल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
राज्यभरातील ८७ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या सात तारखेला होणे अपेक्षित असते. कोविड आणि कर्मचाऱ्यांनी प्रदीर्घ काळ केलेल्या संपामुळे ही परंपरा बंद पडली. त्यात भरीस भर म्हणून कर्मचाऱ्यांसाठी एप्रिलचे वेतन देण्यासाठी राज्य शासनाने वेगवेगळ्या सवलतीच्या प्रतिपूर्तीची रक्कम अद्याप महामंडळाकडे वर्ग केलेली नाही. त्यामुळे एप्रिल-२०२४ चे वेतन ११ तारीख उलटली तरी न झाल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कोल्हापूर विभागात चालक, वाहक, तांत्रिक कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी असे ४१०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनासाठी ८ ते १० कोटींचा निधी दर महिन्याला लागतो. वरिष्ठ कार्यालयाकडून हा विभागाला सात तारखेपूर्वीच वर्ग होत असतो. यंदा मात्र तो न झाल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
...
वेतन उद्या जमा होण्याची शक्यता
राज्य शासनाने आज जरी ३५० कोटी रुपये वर्ग केले तरी शनिवार-रविवार असे दोन दिवस सुटी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सोमवारीच पगाराची रक्कम जमा होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT