कोल्हापूर

सांगली जिल्हा बँक

CD

सांगली जिल्हा बॅँकेची चौकशी सुरू

सांगली, ता. ११ : सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील मागील संचालक मंडळात संचालकांची सहकार अधिनियम कलम ८८ अंतर्गत चौकशी सुरू झाली आहे. यासाठी चौकशी अधिकारी तथा कोल्हापूरच्या उपनिबंधक डॉ. प्रिया दळणकर यांनी बॅँकेकडून कलम ८३ अंर्तगत झालेल्या चौकशीचा अहवाल मागवला आहे. दोन ते तीन दिवसांत बॅँकेला ८८ अंतर्गत कलम ७२ (१) ची नोटीस बजावण्यात येणार असून, याद्वारे संबंधित संचालक, अधिकारी यांची माहिती व अन्य कगदपत्रे सादर करण्यास सांगण्यात येणार आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या गैरकारभाराबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे सुनील फराटे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. यानंतर तक्रारीतील मुद्यांच्या अनुषंगाने बॅँकेचे सुरुवातीला विशेष लेखा परीक्षक छत्रीकर यांच्या समितीने चाचणी लेखापरीक्षण केले. यात काही तक्रारीत तथ्य आढळल्याने सहकार अधिनियम कलम ८३ अंतर्गत चौकशीची शिफारस छत्रीकर समितीने केली. त्याअंतर्गत नाशिकचे जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी चौकशी केली. चौकशीतही काही आरोपात तथ्य आढळले. बॅँकेचे सुमारे ५० कोटी ५८ लाखांच नुकसान झाले असून, या नुकसानीची जबादारी निश्‍चित करून त्याची वसुली करण्यासाठी सहकार अधिनियमातील कलम ८८ अंतर्गत चौकशीची शिफारस जाधव यांनी केली होती. चौकशीसाठी कोल्हापूरच्या उपनिबंधक डॉ. प्रिया दळणकर यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार दळणकर यांनी आता ही चौकशी सुरू केली आहे. त्यांनी बॅँकेकडून अहवाल मागवला आहे. त्यानुसार माजी संचालक, अधिकारी यांची नावे, पत्ते तसेच अन्य माहिती व चौकशीच्या अनुषंगाने आवश्यक कादगपत्रे सादर करण्याबाबत जिल्हा बॅँकेला येत्या दोन-तीन दिवसांत नोटीस दिली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT