कोल्हापूर

बस पेटली

CD

83212, 83213
...
केएमटी बस शॉर्टसर्किटने पेटली
यंत्रशाळेतील दुर्घटनाः निम्मी बस आगीत खाक, पंधरा लाखांचे नुकसान
कोल्हापूर, ता. १२ ः दुरुस्ती करून केएमटी यंत्रशाळेत उभी केलेली केएमटी बस सायंकाळी शॉर्टसर्किटने पेटली. केवळ पंधरा ते वीस मिनिटांत पत्र्याचा भाग वगळता निम्मी बस खाक झाली. तिच्या शेजारी उभ्या असलेल्या भंगारातील दोन बसनाही झळ पोहचली. जवळपास पंधरा लाखांचे नुकसान झाले.
यंत्रशाळेत सकाळी दुरुस्ती झाल्यानंतर चालकाने बस स्क्रॅप झालेल्या बसशेजारी उभी केली होती. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे थोडा धूर आला. त्यानंतर अचानक आग लागली. कर्मचाऱ्यांनी आगीचे स्वरूप पाहता अग्निशमन दलाला पाचारण केले. प्रतिभानगर व सासने मैदान फायर स्टेशनच्या दोन गाड्यांसह स्टेशन ऑफिसर जयवंत खोत, रझाक मुल्लाणी, फायरमन नवनाथ साबळे, विशाल चौगुले, संभाजी ढेपले यांनी आग आटोक्यात आणली. दोन गाड्या व फायरमनी जवळपास अर्धा तास पाणी मारले. चालकाच्या केबिनबरोबरच अंतर्गत भागातील वायरिंग, फायबर सीट असे फायबरचे सर्व भाग जळून खाक झाले. यंत्रशाळेत हा प्रकार घडल्याने जीवितहानी झाली नाही. या बसच्या आगीमुळे शेजारी उभ्या असलेल्या दोन बंद गाड्यांची समोरील बाजूही जळाली.
...
६९ मधील एक कमी
केएमटीच्या उपलब्ध ७५ बसेसपैकी ६९ बस रस्त्यावर धावत होत्या. त्यातील ही बस खाक झाली. या बसचे आयुर्मान दहा वर्षांचे असून, आता नऊ वर्षे झाली आहेत. त्यामुळे ही बस दुरुस्त केली जाण्याची शक्यता कमी आहे. नवीन इलेक्ट्रिक बस आल्यानंतर काही काळ या बस सुरू राहतील, पण त्यानंतर आयुर्मानानुसार त्या बंद कराव्या लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT