कोल्हापूर

रस्ते ठिय्या

CD

फोटो 83370

ठेकेदार कंपनीच्या कार्यालयात कृती समितीचा ठिय्या
मंगळवार पेठेतील रस्त्याचे काम १ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन हवेतच

कोल्हापूर, ता. १३ : मंगळवार पेठेतील रस्त्याचे काम १ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन देऊनही काहीच हालचाल केली नसल्याने कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदार कंपनीच्या नागाळा पार्कमधील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. महापालिकेकडून रस्त्यावरील अडथळे दूर केले जात नसल्याने विलंब होत असल्याचे कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकांनी स्पष्ट केले. महापालिकेने आठ दिवसांत अडथळे दूर केले नाहीत, तर २० मे रोजी प्रशासक व शहर अभियंत्यांना घेराओ घालण्याचा इशारा समितीने दिला.
चार महिन्यांपूर्वी कामाची वर्कऑर्डर मिळाली. पण, काम सुरू झाले नसल्याने आंदोलन केल्यानंतर शहर अभियंता यांनी समितीची ठेकेदार कंपनी, सल्लागार यांची संयुक्त बैठक घेतली. त्यावेळी १ मे रोजी मंगळवार पेठेतील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण करणार व १५ मेपूर्वी पाच रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. पण, आजही कामाची स्थिती जैसे थे असल्याने समितीने ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. त्याप्रमाणे आज समितीच्‍या कार्यकर्त्यांनी ठेकेदार कंपनीचे नागाळा पार्कमधील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून मेणबत्ती घेऊन कार्यालय शोधले. त्यात एक संगणक, खुर्च्या यांसह किरकोळ साहित्य होते. त्यात कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला. १०० कोटींचे गौडबंगाल काय? निधी रस्ते कामांसाठी की टक्केवारीसाठी, रस्ते काम बंद तर लोकप्रतिनिधींचे तोंड का बंद, सुसज्ज रस्ते करा, जनतेचे प्राण वाचवा, अशा घोषणांचे फलक कार्यकर्त्यांच्या हातात होते.
यावेळी प्रकल्प व्यवस्थापक सत्तार मुल्ला यांना बोलवून घेतले. त्यांना कामाबाबत जाब विचारल्यानंतर आम्ही ताबडतोब रस्ते तयार करून द्यायला तयार आहोत. पण, महापालिकेकडून रस्त्यातील जलवाहिन्या, ड्रेनेज लाईन, विद्युत लाईन, अतिक्रमणे दूर करून देण्यास सहकार्य मिळत नाही. त्यामुळे हतबल झालो आहोत, असे मुल्ला यांनी सांगितले. प्रशासनाने सहकार्य करावे. ३१ मेपूर्वी जास्तीत जास्त रस्त्याचे काम पूर्ण करून देऊ. त्यावर समितीने आठ दिवसांत महापालिकेने ठेकेदार कंपनीला कामातील अडथळे दूर करून दिले नाहीत, तर सोमवारी (ता. २०) प्रशासक व शहर अभियंत्यांना घेराओ घालण्याचा इशारा दिला. यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, शामराव जोशी, गजानन यादव, प्रकाश चुयेकर, सदानंद सुर्वे, किशोरी यादव, प्रकाश आमते, कादर मलबारी, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT