कोल्हापूर

शहरात तुरळक पावसाची हजेरी

CD

83484
....
शहरात तुरळक पावसाची हजेरी
विजांचा कडकडाटः
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : दुपारी ढगाळ वातावरण आणि रात्री विजांच्या कडकडाटासह शहरात पावसाने तुरळक हजेरी लावली. दिवसभर उष्म्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना अचानक झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने गारवा जाणवला. काही काळ झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
सकाळपासूनच रणरणत्या उन्हाच्या झळा जाणवल्या. दुपारनंतर वातावरणात थोडा बदल होऊन ढगाळ वातावरण झाले. यामुळे केव्हाही पावसाच्या धारा कोसळतील अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु पावसाने हुलकावणी दिली. वातावरणात प्रचंड उष्मा असल्याने नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा निघाल्या. सायंकाळी पाचच्या सुमारास पुन्हा उन्हाच्या झळा जाणवल्या. रात्री अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊस सुरू झाला. यामुळे शहरवासीयांची तारांबळ उडाली. मोटासायकलस्वारांसह पादचाऱ्यांनीही पावसापासून बचावासाठी मार्गावरील आडोशाचा आधार घेतला. काही काळ सरी कोसळल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. काही वेळाने विजांचा कडकडाट ही थांबला. दिवसभर घामाघूम झालेल्या शहरवासीयांना अचानक झालेल्या पावसाने गारवा मिळाला.
...
मुरगूड परिसरात वळीव
मुरगूड : शहर व परिसरात आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने हजेरी लावली. सायंकाळी चार वाजल्यापासून आकाशात ढग जमायला सुरुवात झाली होती. सायंकाळी सात वाजल्यापासून तर विजेचा कडकडाट सुरु झाला.जोराचे वादळ वारे सुरू झाले. त्यानंतर जोरदार वळीव पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धातास हा पाऊस सुरू होता.
...

अंबप: येथे रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करताना (छायाचित्र- संजय पाटील, घुणकी)
---
वादळी वाऱ्यासह पाऊस
घुणकीः हातकणंगले तालुक्यातील पश्चिम विभागातील किणी, घुणकी, चावरे, वाठार, अंबप, पाडळी, मनपाडळे, पारगांव,निलेवाडी परिसरात आज रात्री वादळी वारा, विजांचा कडकडाटासह वळीवाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने मिळभागातील पिकांना जीवदान मिळाले.
वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या. त्या रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले.
...
खोची परिसराला झोडपले
खोचीः महिनाभर हुलकावणी देत असलेल्या वळीव पावसाने खोचीसह परिसराला झोडपून काढले. जोरदार वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे अनेक छप्परे, घरांचे पत्रे उडून गेले. गावातील काही घरांवर घरालगतच्या झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना नुकसानीस सामोरे जावे लागले आहे.
...
भुदरगडला सलग तीन दिवस पाऊस

गारगोटी : भुदरगड तालुक्यात सोमवारी रात्री आठच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. या दरम्यान वादळी वारे जोमाने वाहू लागले. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. सलग तीन दिवस तालुक्यात पाऊस पडत आहे. वाघापूर, गंगापूर, मडिलगे परिसरात पावसाचा जोर कायम आहे.
...
बोरपाडळे परिसरात पाऊस
बोरपाडळे : परिसरात शहापूर, मोहरे, माले, काखे आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. विजा आणि वाऱ्यासह आलेल्या पावसाने दिवसभराच्या कडक उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना गारवा मिळाल्याने दिलासा मिळाला.
...
गडहिंग्लजला वळीव
गडहिंग्लज : शहर आणि तालुक्यात ठिकठिकाणी आज तिसऱ्या दिवशीही वळीव पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. दिवसभर उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा दिला असून हवेत गारवा निर्माण झाला आहे.
...
राशिवडेसह भोगावती परिसरात दमदार
राशिवडे बुद्रुक : आज रात्री राशिवडेसह भोगावती परिसरात वळवाचा दमदार पाऊस झाला. विजेच्या कडकडाटांसह आलेल्या पावसामुळे पाणीच पाणी झाले. तासभर झालेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT