कोल्हापूर

प्रेस क्लब शिष्टमंडळाची डीवायएसपी भेट

CD

जमादार याच्याविरोधात सबळ पुरावा
पोलिस उपअधीक्षक क्षीरसागर : प्रेस क्लबच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
कोल्हापूर, ता. १३ : बातमीदार मारहाणप्रकरणी माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचा (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजेखान जमादार याच्याविरोधात सबळ पुरावा असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी आज कोल्हापूर प्रेस क्लबच्या शिष्टमंडळाला दिली. मुरगूड (ता. कागल) येथील ‘सकाळ’चे बातमीदार प्रकाश तिराळे यांना मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. पुढे तपासात काय प्रगती झाली याची माहिती घेण्यासाठी आज प्रेस क्लबच्या शिष्टमंडळाने क्षीरसागर यांची भेट घेतली.
बातमीदार तिराळे यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची गंभीर दखल जिल्ह्यातील पत्रकारांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबने घेतली आहे. ज्या दिवशी मारहाण झाली त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रेस क्लबने पुढाकार घेतला. पोलिस दलातील वरिष्ठांपर्यंत या मारहाणीची दाहकता दाखवून दिली. यानंतर त्या दिवशी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला. मात्र, त्यानंतर तपासात पुढे काय झाले, याची माहिती आज प्रेस क्लबने घेतली. यासाठी प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, कार्याध्यक्ष दिलीप भिसे, समीर देशपांडे, पांडुरंग दळवी, समीर मुजावर यांच्यासह इतर सदस्यांनी आज तपास अधिकारी क्षीरसागर यांची भेट घेतली. तसेच जमादार यांच्याबाबत अन्य तक्रारी असतील तर त्यांचीही दखल घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
दरम्यान, राजेखान जमादार याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेजही पंचनामा म्हणून जप्त केले आहेत. यामध्ये बातमीदार तिराळे यांना मारहाण केल्याचा सबळ पुरावा मिळाला आहे. अधिक तपास सुरू आहे. त्याचे दोषारोप पत्र सुद्धा मी लवकरच दाखल करणार आहे, अशीही माहिती क्षीरसागर यांनी शिष्टमंडळाला दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT