कोल्हापूर

इचल : जिल्हाधिकारी बैठक

CD

ich139.jpg

कोल्हापूर ः अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत बैठकीत चर्चा करताना आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह मान्यवर.
...
नदीपात्रातील गाळ शेतकऱ्यांना देण्याबाबत चर्चा
आमदार आवाडे यांचा पाठपुरावा : अंतिम निर्णयासाठी उद्या पुन्हा बैठक
इचलकरंजी, ता. १३ ः येथील पंचगंगा नदीपात्रातील बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस साचलेला गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यासाठी आज अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यासाठी पाठपुरावा करणारे आमदार प्रकाश आवाडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याप्रश्नी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून अंतिम निर्णयासाठी १५ मे रोजी संबंधितांची पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
इचलकरंजीतील पंचगंगा नदी पात्रातील गाळ शेतकऱ्यां‍ना मोफत काढून नेण्यासाठी परवानगी देण्याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आदेश दिला आहे. त्या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक पार पडली. या बैठकीस प्रांताधिकारी मौसमी चौगुले, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, महापालिकेचे जलअभियंता सुभाष देशपांडे आदी उपस्थित होते.
येथील पंचगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. याप्रश्नी आमदार आवाडे यांनी मंत्री विखे-पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यावर दोन महिन्यांपूर्वी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यां‍ना या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. हे काम उन्हाळ्यातच शक्य असल्याने तातडीने कार्यवाही करण्याबाबत आमदार आवाडे यांनी सतत पाठपुरावा सुरू केला आहे. आजच्या बैठकीत या विषयाची सविस्तर चर्चा झाली.
‘पंचगंगा नदी गाळमुक्त झाल्यास शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच पाणी गतीने पुढे प्रवाहित होण्याच्या मार्ग मोकळा होणार असल्यामुळे महापुराचा धोकाही टाळण्यास मदत होणार आहे’, असे आमदार आवाडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी राहुल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, नरसिंह पारीक, राहुल घाट, सतीश मुळीक, नीतेश पोवार आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT