कोल्हापूर

पर्यावरण अभियंता निलंबित

CD

वृक्षतोडप्रकरणी अधिकाऱ्यासह
प्रभारी मुकादम निलंबित

महापालिका प्रशासकाचा आदेश

कोल्हापूर, ता. १४ ः वृक्ष प्राधिकरण समितीच्या निर्णयाप्रमाणे शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानातील झाडांच्या केवळ फांद्या तोडण्याऐवजी बुंध्यासह वृक्षतोड केल्याप्रकरणी महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, तसेच प्रभारी मुकादम अमृत शिंदे यांना प्रशासकांनी निलंबित केले आहे. त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेशही दिले असून, दररोज महापालिकेत हजेरी देण्याचा आदेश दिला आहे.
प्रशासक या अध्यक्ष असलेल्या समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता परस्पर उद्योग केला. तसेच तोड झाल्यानंतर समितीनेच तसा आदेश दिला असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. या तोडीवरून पर्यावरणप्रेमी तसेच समितीतील सदस्यांनी प्रशासकांकडे तीव्र आक्षेप नोंदवला आणि कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासकांनी व्याघ्रांबरे यांना तत्काळ निलंबित केले.
व्याघ्रांबरे यांच्याकडे उद्यान अधीक्षकपदाचा प्रभारी कार्यभारही होता. पद्माराजे उद्यानामधील दोन रबर जातीच्या व इतर वृक्षांची फांद्या तोड करून मिळावी म्हणून परिसरातील नागरिक व संघटनांनी उद्यान विभागाकडे जानेवारीत अर्ज दिला होता. उद्यान विभागाने वृक्ष प्राधिकरण समितीसमोर तो सादर केला होता. फेब्रुवारीत झालेल्या समितीच्या बैठकीत फांद्या तोड करण्यास मान्यता देण्यात येत आहे. वृक्षतोड नामंजूर करण्यात येत असल्याचा निर्णय दिला होता.
मात्र व्याघ्रांबरे यांनी समितीच्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही न करता एप्रिल महिन्यात दोन रबर व अकरा अशोकाच्या झाडांची बुडक्यासह तोड केल्याची बाब निदर्शनास आली. समितीच्या सदस्यांनी ही बाब गंभीर असल्याने कारवाईची मागणी केली होती. त्यावर पर्यावरण अधिकारी तसेच प्रभारी उद्यान अधीक्षक व्याघ्रांबरे यांना सोमवारपासून तत्काळ निलंबित करण्यात येत आहे. तसेच विभागीय चौकशी करण्याचे आदेश प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिले. याशिवाय निलंबन कालावधीत त्यांनी परवानगीशिवाय कोल्हापूर मुख्यालय सोडायचे नाही. तसेच दररोज उपायुक्त कार्यालयामध्ये हजेरी द्यावी, असेही आदेश दिले आहेत. वेतन देण्यापूर्वी इतर कोठेही नोकरी करत नसल्याचे प्रमाणपत्र प्रत्येक महिन्याला आस्थापना विभागाला सादर करायचे आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT