कोल्हापूर

लुटमारप्रकरणी चौघे ताब्यात

CD

लूटमारप्रकरणी चौघेजण ताब्यात

कोल्हापूर, ता. १४ ः चैनीसाठी पादचाऱ्यांची लूटमार करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. संशयितांकडून दोन मोबाईल, मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. रवी नामदेव पोवार (वय २५), अजय चंद्रकांत चव्हाण (२५), सचिन अशोक चव्हाण (२६), विनायक अनिल चव्हाण (२५, सर्व रा. शांतिनगर, गडमुडशिंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, मार्केट यार्ड परिसरातून निघालेल्या दोघांना रस्त्यात अडवून लुटण्यात आले होते. संशयितांनी दोन मोबाईल पळवून नेल्याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. या गुन्ह्यातील संशयित रवी पोवार याच्यावर यापूर्वीही पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तो उचगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार राम कोळी, सुरेश पाटील, सागर माने यांना मिळाली होती. त्यांना सापळा रचून पोवारला ताब्यात घेतले. त्याने अन्य तीन साथीदारांच्या मदतीने मार्केटयार्ड परिसरात केलेल्या लुटीची कबुली दिली. पोलिसांनी चौघांना अटक करून लुटीतील मोबाईल, दोन मोटारसायकली असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईत उपनिरीक्षक सागर वाघ, समीर कांबळे, अमित सर्जे, संजय पडवळ यांनी सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT