कोल्हापूर

लक्ष्मीपुरीत सांडपाणी रस्त्यावर

CD

फोटो 83689

लक्ष्मीपुरीत सांडपाणी रस्त्यावर
दोन दिवासांपासून प्रकार; नागरिक, विक्रेते त्रस्त

कोल्हापूर, ता. १४ ः लक्ष्मीपुरीतील रॉयल टॉकीजसमोरील गल्लीतील सांडपाणी दोन दिवस रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यालगत सांडपाण्याचे तळे झाले असून, त्यातच विक्रेते फळ, भाज्या विक्री करत आहेत. नागरिकांनाही त्यातूनच बाजार करावा लागत आहे.
रॉयल टॉकीजसमोरील रस्त्यावर वारंवार ड्रेनेज तुंबत होते. त्याच्या मॅनहोलमधून सांडपाणी रस्त्यावरून वाहत असायचे. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना वारंवार स्वच्छता करावी लागत होती. दोन दिवसांपासून रस्त्याशेजारी असलेल्या सांडपाणी चेंबरमधून बाहेर पडून संपूर्ण रस्त्यावरून वाहत आहे. ते पाणी लक्ष्मीपुरी बाजारातील मुख्य रस्त्यावर येत आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूला तळे झाले असून, त्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. रस्त्यालगत असलेले विक्रेते त्या सांडपाण्यातच उभे राहून व्यवसाय करत आहेत.
दोन दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार थांबला नसल्याने महापालिकेचे भागातील सफाई कर्मचारी काय करतात, अशी विचारणा विक्रेते, नागरिकांकडून होत आहे.

चौकट
वाय. पी. पोवारनगर चौकातही तळे
काही दिवसांपासून वाय. पी. पोवारनगर चौकात ड्रेनेजलाईन ओसंडत आहे. त्याचे सांडपाणी चौकात तुंबून रस्त्यावरून वाहत जात असल्याने स्टेट बॅंकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दलदल झाली आहे. त्याची दुर्गंधी पसरली असून, त्याच्या सफाईसाठी प्रयत्न झालेले नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT