कोल्हापूर

रिंगरोड अतिक्रमण तसेच इतर समस्या दूर करा

CD

83841
कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोडवरील समस्या दूर करण्यासाठी पतित पावन संघटनेतर्फे शहर अभियंत्यांना निवेदन दिले.

फुलेवाडी रिंगरोड खड्डेमुक्त करा
‘पतित पावन’ची मागणी; अन्य समस्यांकडेही वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : अतिक्रमणे, खड्डे, अपघात, धुळीचे साम्राज्य, नागरिकांना होणारे श्‍वसनाचे आजार अशा गंभीर समस्यांच्या विळख्यात कळंबा साई मंदिर ते फुलेवाडी नाक्यापर्यंतचा रिंगरोड सापडला आहे. त्या समस्या तात्काळ दूर कराव्यात, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा पतित पावन संघटनेने निवेदनाद्वारे महापालिकेला दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, या रस्त्याची खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वाहने गेल्यास मोठी धूळ उडते. त्या धुळीमुळे नागरिकांना श्‍वसनाचा त्रास होत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात लहान-मोठे अपघात होत आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, दुकाने, केबिन्स व अतिक्रमणांमुळे हा रस्ता छोटा झाला आहे. त्यामुळे रिंगरोड सुविधेऐवजी असुविधांचा झाला आहे. त्यासाठी महापालिकेने रस्त्याचे सुशोभीकरण करावे, दुतर्फा गटारी कराव्यात, अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, दुभाजक बसवावेत, उच्च दर्जाचे डांबरीकरण करण्यात यावे. नागरिक महापालिकेस कर देत असल्याने त्याला अतिक्रमणमुक्त, समस्यांमुक्त दर्जेदार रस्ता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. ती जबाबदारी महापालिकेने पूर्ण केली नाही, तर संघटना आंदोलन करेल. याबाबतचे निवेदन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले. यावेळी शहर अध्यक्ष अतुल कोईगडे, संजीव सलगर, गणेश मोरे, विनोद बामणकर, बाळूसिंग रजपूत, काका मोहिते, सचिन भोईटे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT