कोल्हापूर

आयआयएफ कोल्हापूर

CD

फोटो 84149

संरक्षण क्षेत्राच्या आत्मनिर्भरतेसाठी उद्योजकांनी साथ द्यावी
डॉ. काशिनाथ देवधर; ‘आयआयएफ’ कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी विनय खोबरे

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः ताकद असेल, तर जग सन्मान देते हे आपल्या देशाने संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. ही आत्मनिर्भरता आणि क्षमता वाढविण्यासाठी संरक्षण क्षेत्रातील सामग्री उत्पादनासाठी उद्योजकांनी साथ द्यावी, असे आवाहन ‘डीआरडीओ’चे निवृत्त शास्त्रज्ञ आणि गन एक्सपर्ट डॉ. काशिनाथ देवधर यांनी आज येथे केले.
येथील रेसिडेन्सी क्लबमध्ये दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन (आयआयएफ) कोल्हापूर चॅप्टरच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी ‘संरक्षण क्षेत्रातील भारताचा विकास व नवीन तंत्रज्ञान’ याविषयावर मार्गदर्शन केले. या सभेत मावळते अध्यक्ष महेश दाते यांनी ‘आयआयएफ कोल्हापूर’चे नूतन अध्यक्ष विनय खोबरे (शकुंतला स्टील, गोकुळ शिरगाव एमआयडीसी) यांचे नाव जाहीर केले. अध्यक्ष खोबरे यांनी त्यांच्या नवीन कार्यकारिणीमधील उपाध्यक्ष राहुल पाटील (फर्नेस फिडर्स, शिरोली एमआयडीसी), सचिव मिलिंद बिरादार (गणेश क्वॉलिटी मशीनस्, इचलकरंजी) आणि खजानीस अभिषेक सोनी (टेक्नोमेट एंटरप्राइजेस, शिरोली एमआयडीसी) यांची निवड जाहीर केली. डॉ. देवधर यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला.
डॉ. देवधर म्हणाले, ‘डीआरडीओ’च्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रातील विविध दलांसाठी लागणारी क्षेपणास्त्रे, रणगाडा, पाणबुडी आदी अद्ययावत शस्त्रास्त्रे आणि संरक्षण साधनांच्या निर्मितीमध्ये नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाने मोठी पावले टाकली आहेत. अनेक देश आपल्याकडून शस्त्रास्त्रे, संरक्षण साधने तयार करून घेत आहेत. या क्षेत्रातील आपण जगातील मोठे निर्यातदार म्हणून पुढे येत आहोत. बॉम्बबॉडी, फोर्जिंगसाठी कास्टिंग्ज लागते. त्यामुळे या क्षेत्रात फौंड्रीसह विविध उद्योजकांना योगदान देण्याची चांगली संधी आहे. त्यादृष्टीने धोरणात सरकारने बदल केले आहेत. डिफेन्समधील ॲप्लीकेशन, सबसिस्टीम, सेन्सर, ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, मशिनिंग, आदींपैकी कोणत्या क्षेत्रात काम करता येईल ते जाणून घेऊन त्याची निवड करून उद्योजकांनी कार्यरत व्हावे.’
सचिव मिलिंद बिरादार यांनी सेक्रेटरीअल, तर खजिनदार राहुल पाटील यांनी फिनान्शिअल रिपोर्ट सादर केला. यावेळी सचिन शिरगावकर, राजीव पारीख, मंगेश पाटील, नीरज झंवर, मल्हार भांदुर्गे, भरत जाधव, प्रकाश राठोड, हरिश्चंद्र धोत्रे, सुरेंद्र जैन, कमलाकांत कुलकर्णी, शाम तोतला, मिलिंद भावे, दीपक जाधव, शिरीष सप्रे, सूरजितसिंग पवार, अभिजित नाईक आदी उपस्थित होते. समीर पारीख यांनी सूत्रसंचालन केले.
.....
कोट
‘़आयआयएफ’च्या सर्व घटकांना सोबत घेऊन फौंड्री उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी काम करणार आहे. उद्योगविस्तारासाठी जागा उपलब्धता, वीजदर कमी करणे आदी प्रश्न सोडविण्यास आमचे प्राधान्य राहणार आहे.
-विनय खोबरे, अध्यक्ष, आयआयएफ कोल्हापूर चॅप्टर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT