कोल्हापूर

मॉन्सूनपूर्व पावसाचा सिंधुदुर्गला तडाखा

CD

टीपः swt1631.jpg मध्ये फोटो आहे.
84141
हरकूळ ः वादळी पावसाने येथील अब्‍दुल करीम रेहमान यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले.

मॉन्सूनपूर्व पावसाचा सिंधुदुर्गला तडाखा

हरकूळला १०० घरांचे नुकसान; इतरही ठिकाणी पडझड

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १६ ः मॉन्सूनपूर्व पावसाच्या तडाख्याने आज जिल्ह्याच्या अनेक भागांत दाणादाण उडाली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह जिल्ह्याच्या अनेक भागाला पावसाने झोडपून काढले. वैभववाडी, कणकवली, खारेपाटण परिसरांतील अनेक गावांमध्ये मोठी पडझड झाली. काही इमारतींच्या छप्परांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी वीज खांब, वीज वाहिन्या उन्मळून पडल्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. सखल भागात पावसाचे पाणी साचल्याचे चित्र खारेपाटण परिसरात दिसून आले. तालुक्‍यातील हरकूळ बुद्रुकसह हळवल, कळसुली, साकेडी या गावांना जोरदार वादळाचा तडाखा बसला. यात एकट्या हरकूळ गावातच सुमारे १०० घरांचे नुकसान झाले आहे. या गावातील शेखवाडीमधील घरांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे. शेखवाडीमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत २५ घरांचा पंचनामा झाला होता. त्याचप्रमाणे गावठाणवाडी व अन्य वाड्यांमध्येही सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी एक वाजल्यानंतर जिल्ह्यात पावसाचे वातावरण तयार झाले. वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील काही गावांमध्ये दुपारी दोन वाजल्यापासून विजांचा कडकडाट आणि वादळी वारा सुरू झाला. डोंगरपायथ्याशी असलेल्या गावांमध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली. दुपारी अडीचनंतर जोरदार वारे वाहू लागले. यात वादळाचा सर्वाधिक फटका हरकूळ गावातील शेखवाडी आणि गावठाणवाड्यांना बसला. अनेक घरांचे पत्रे उडून दूर गेले व ते दुसऱ्या घरांवर पडून मोठे नुकसान झाले, तर काही घरांवर झाडे आणि फांद्या कोसळून नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यातील हरकूळ बुद्रुकबरोबरच हळवलमध्ये २०, कळसुली गावात १२ आणि साकेडी गावात ७ घरांचे नुकसान झाले आहे. वैभववाडी तालुक्यातील नावळे, सडुरे, अरूळे यांसह विविध गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. करूळला तर पावसाने चांगलेच झोडपून काढले.
वादळाच्या तडाख्यात अनेक घरांचे पत्रे, कौले उडाली आहेत. तसेच घरावर झाडे कोसळूनही घरांचे नुकसान झाले आहे. शेखवाडी येथे अचानक आलेले वादळ आणि घरांचे छप्पर उडून जात असल्‍याने येथील काही नागरिकांनी लगतच्या स्लॅबच्या घरांमध्ये जाऊन आश्रय घेतला. वादळानंतर मुसळधार सरीही कोसळल्‍या. त्‍यामुळे शेखवाडी येथील अनेक घरांमध्ये अर्ध्या फुटापर्यंत पाणी साचले होते. दरम्‍यान, जोरदार वारे, घरावर कोसळणारी झाडे तसेच अंगण व परिसरात वीज ताराही कोसळल्‍या. पावळामुळे घरातील चीजवस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT