कोल्हापूर

‘कोल्हापूर हायकर्स’तर्फे शिवराज्याभिषेक दिनी होणार जलाभिषेक

CD

‘कोल्हापूर हायकर्स’तर्फे
शिवराज्याभिषेकदिनी जलाभिषेक
देशातील गड, नद्यांमधील पाण्याचे संकलन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : शिवराज्याभिषेक दिन सोहळा सहा जून रोजी रायगडावर भव्यदिव्य स्वरुपात साजरा होत आहे. ‘कोल्हापूर हायकर्स’ तर्फे यावर्षी हिमालयातील पवित्र जलासोबतच सह्याद्रीतील गड-किल्ले व नद्या अशा विविध ठिकाणांहून पाणी संकलित करण्यात आले आहे. यामध्ये जिंजी (तमिळनाडू), केदारनाथ (उत्तराखंड), सरस्वती नदी (माना उत्तराखंड), भुदरगड, रांगणा, मौनी महाराज समाधीस्थळ, तोरणा येथील पाण्याचा समावेश आहे, अशी माहिती कोल्हापूर हायकर्सचे संस्थापक सागर पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, ‘सह्याद्री पर्वत रांगा आणि हिमालयातून ट्रेकिंग करून दरवर्षी कोल्हापूर हायकर्सचे मावळे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हे जल आणत असतात. यंदासुद्धा देशाच्या चारी दिशांतून हे जल आणण्याची मोहीम हाती घेऊन यशस्वी करण्यात आली. यासाठी कोल्हापूर हायकर्सचे पहिले पथक एक मे महाराष्ट्र दिनापासून या पवित्र जल संकलन मोहिमेसाठी रवाना झाले होते. विविध ठिकाणांहून हे पवित्र जल एकत्रित करून पाच जून रोजी रायगडावर पोहोचवणार आहोत. त्यानंतर सहा जून रोजी शिवराज्याभिषेकदिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर जलाभिषेक करण्यात येईल.’ यावेळी राजेंद्र भस्मे, श्रावणी पाटील, विजय ससे, इंद्रजित मोरे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT