कोल्हापूर

शहरातील ए, बी, वॉर्डात मंगळवारी, बुधवारी पाणी नाही

CD

शहरातील ए, बी, वॉर्डात
मंगळवारपासून पाणीबाणी
तपोवन मुख्य जलवाहिनीला क्रॉस कनेक्शनचे काम सुरू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : अमृत योजनेंतर्गत तपोवन मैदान येथे पाणीपुरवठ्याच्या मुख्य पाईपलाईनला क्रॉस कनेक्शन करण्याचे काम मंगळवारी (ता.४) हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ए.,बी., वॉर्ड व त्याला संलग्न असणाऱ्या उपनगर व आसपाच्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा मंगळवार (ता.४) व बुधवारी (ता.५) असे दोन दिवस बंद राहणार आहे. तसेच गुरुवारी (ता.६) होणारा दैनंदिन पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
ए, बी, वॉर्डमधील पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रावरून शहराअंतर्गत होणाऱ्या कळंबा जेलसमोरील डॅश ग्रुप, विश्‍वास पार्क, एल.आय.सी. कॉलनी परिसर, अमरनाथ मंदिर परिसर, बाबूराव साळोखे मार्क परिसर, तोपवन परिसर, म्हाडा कॉलनी, सोमराज कॉम्प्लेक्स, नाळे कॉलनी परिसर, जिवबा नाना जाधव पार्क, कारदगे हिल्स परिसर, श्रीराम कॉलनी, साई कॉलनी, साळोखेनगर संपूर्ण परिसर, मोहिते कॉलनी, राजलक्ष्मीनगर, देवकर पाणंद, एन. टी. सरनाईकनगर, योगेश्वरी कॉलनी, रायगड कॉलनी, चव्हाण कॉलनी, मोहिते कॉलनी, गणपतीनगर, पार्वती पार्क, भोसले कॉमलेकर, मल्हार रेसिडेन्सी, शिवप्रभूनगर, मोरे-माने नगर, राणे कॉलनी, राजू गांधीनगर, अक्काताई मानेनगर, महादेव नगरी, जनाईदत्त नगर, विद्या विहार कॉलनी, जुनी मोरे कॉलनी, संभाजीनगर बसस्थानक, नवीन मोरे कॉलनी, जोशीनगर, विजयनगर, शहाजी वसाहत, संभाजीनगर, शाहू मिल, गंजी माळ, रामानंदनगर, जरगनगर, रेणुकानगर, आर. के. नगर, गणेश कॉलनी, हुनमाननगर, जोतिर्लिंग कॉलनी, रायगड कॉलनी, हॉकी स्टेडियम, बालाजी पार्क, यशवंत पार्क, जाधवनगर, खंडोबा मंदिर, भारतनगर, सुभाषनगर, वाय.पी.पोवारनगर, मंगळवार पेठ, वारे वसाहत, शाहू बँक परिसर, राम गल्ली, भारत डेअरी परिसर, मंगेशकरनगर, बेलबाग, मंडलिक वसाहत, पाटाकडील तालीम, बजापराव माने तालीम, जासूद गल्ली, कोळकर तिकटी, पोवार गल्ली, शिवाजी पेठ, वेताळ माळ तालीम, ८ नं शाळा, फिरंगाई गल्ली, टिंबर मार्केट, कांदेकर गल्ली, सरदार तालीम परिसर, शहाजी वसाहत परिसर, साळोखेनगर, आपटेनगर, क्रांतिसिंह नाना पाटील, बीडी कॉलनी, बोंद्रेनगर, राजोपाध्येनगर, बाबा ग्रुप, साने गुरुजी वसाहत, राजेसंभाजी तरुण मंडळ, हिंदू कॉलनी परिसर, सुलोचना पार्क, राधानगरी रोड परिसर या भागामध्ये दोन दिवस पाणी येणार नाही.
-------------
चौकट
पाणी काटकसरीने वापरा
दोन दिवस पाणी येणार नसल्याने नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT