कोल्हापूर

पावसाची प्रतिक्षा

CD

बळीराजाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा

उन्हाचा तडाखा वाढलाः जिल्ह्यात १० ते १५ टक्के पेरण्या
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवत आहे. सकाळी ढगाळ वातावरण आणि दुपारी ३४ ते ३६ डिग्रीपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवला. या पार्श्वभूमीवर भरणी झालेल्या उसाला मोठा पावसाची अपेक्षा आहे. मॉन्सून वेळेत धडक देणार असला तरीही अजून त्याला काही दिवसांचा अवधी आहे. या दरम्यान शेतकऱ्यांकडून मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० ते १५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
जिल्ह्यात आठवड्यापूर्वी ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. याचा आधार घेत भात, भुईमूग, सोयाबीनसह इतर पेरण्यांसाठी शेतकऱ्यांनी शिवार फुलून गेले. दोन दिवसांत उन्हाचा पारा चढला आहे. आता आणखी मॉन्सूनपूर्व पावसाची अपेक्षा केली जात आहे. या पावसामुळे पिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शाहूवाडी आणि गगनबावडा तालुक्यात तुरळक प्रमाणात पावसाची नोंद आहे. इतर ठिकाणी मात्र कडक उन्हाचा तडाखा जाणवला.
खरीपाच्या पेरणीसाठी सध्या पोषक वातावरण आहे. यालाच पावसाची जोड हवी आहे. ज्यांनी-ज्यांनी चार दिवसांपूर्वी भात पेरणी केली आहे, त्यांना आता वीज पंपाद्वारे पाणी द्यावे लागत आहे. तर मशागत करुन तयार असणाऱ्या शेतांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे. सकाळी ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाळी वातावरण तयार होते. मॉन्सून जसाजसा जवळ येईल तशी अंगाची लाहीलाही करणारे तापमानही जाणवत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ९५ हजार हेक्टरवर भाताची पेरणी केली जाणार आहे. त्यानंतर भुईमूग, सोयाबीनसह इतर कडधान्यांची पेरणी होणार आहे. आणखी एखादा जोरदार पाऊस झाल्यानंतर पेरण्यांना आणखी गती येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT