कोल्हापूर

महाविकास आघाडी मेरी वेदर, महायुती पितळी गणपती

CD

कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावर येण्यास मज्जाव
महाविकास आघाडी मेरीवेदन ग्राउंडवर तर महायुती पितळी गणपती चौकात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः मतमोजणीवेळी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना पितळी गणपती येथे उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे, तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मेरीवेदन ग्राउंडची जागा निश्चित केली आहे. पोस्ट ऑफिस, पितळी गणपती, भगवा चौक याच्यापुढे कोणतेही वाहन सोडण्यात येणार नाही, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघातील मतमोजणी मंगळवारी (ता. ४) होईल. यावेळी कोणत्या पक्षांनी कोठे थांबायचे हे निश्चित करण्यात आले आहे. कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील धान्य गोदामात आहे. या ठिकाणी पितळी गणपती, पोस्ट ऑफिस, भगवा चौक येथून अत्यावश्यक सेवा वगळून सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाच वाजल्यापासून प्रवेश बंद आहे. बहुउद्देशीय हॉल, शासकीय धान्य गोदाम, रमणमळा, कोल्हापूर व शासकीय गोदाम, राजाराम तलाव, कोल्हापूर परिसरात सकाळी आठ वाजल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पितळी गणपती येथे थांबायचे आहे तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मेरीवेदन ग्राउंड येथे थांबवण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणीही या परिसरात थांबू नये.
...
या कृतीस मनाई...
- मतमोजणी केंद्रापासून २०० मीटर अंतरावर कर्मचारी, सुरक्षाकर्मी वगळता सर्वांना प्रवेश बंदी.
- लाऊड स्पिकरचा वापर लेखी परवानगीशिवाय करण्यास मनाई.
- मतमोजणी केंद्र परिसरात मोबाईल, सॅटेलाईट फोन किंवा तत्सम उपकरणे वापरण्यास बंदी.
- मतमोजणी केंद्राच्या २०० मीटर परिसरात शस्त्र, वाहने नेण्यास बंदी.
---
‘हातकणंगले’ची मतमोजणी जलसंपदा गोदामात
हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलावाजवळील जलसंपदा गोदामात होणार आहे. यावेळी शिवाजी विद्यापीठ गेट नं.१ समोर नॅनो सायन्स येथे महायुतीचे कार्यकर्ते थांबतील. तर युको बँक येथील के.एस.बी.पी चौकात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते थांबतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT