कोल्हापूर

जाहिरात- रवळनाथ हौसिंग सोसायटी

CD

फोटो M87667

‘रवळनाथ''च्या कोल्हापूर
शाखेचा वर्धापन दिन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः येथील श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हौसिंग फायनान्स सोसायटीच्या येथील शाखेचा बारावा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. शाखा सल्लागार प्राचार्य डॉ. एच. व्ही. देशपांडे, प्रा. डॉ. वासंती रासम यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. देशपांडे म्हणाले, ‘सर्वसामान्य लोकांची घरे उभारण्यासाठी ‘रवळनाथ''चे योगदान मोठे राहिले आहे. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शन व दूरदृष्टीमुळे संचालक व सभासदांच्या सहकार्यामुळे गेल्या बारा वर्षात येथील शाखेने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. या शाखेकडे ७६ कोटी ३२ लाखांच्या ठेवी असून, ४४ कोटींची कर्जे वितरित केली आहेत. मोबाईल बॅंकींग, क्यूआर कोड, युपीआय पेमेंट, सीबीएस मायक्रो एटीएम आदी माध्यमातून डिजिटल सेवा दिली जात आहे.’’
पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिकांसाठी नॅशनल ॲटोमेटेड क्लिअरिंग हाऊस ही सेवा तर आजारी, वयोवृद्ध ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाते. संस्थेच्या आकर्षक व्याजाच्या विविध ठेव योजनांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
भास्कर सांगावकर, शाखा सल्लागार अमृत सुतार, प्रा. डॉ. वर्षा मैंदर्गी, प्रा. डॉ. अण्णासाहेब कलगोंडा, प्रा. रवींद्र पोर्लेकर, शाखाधिकारी पंकज कुंभार आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT