कोल्हापूर

कॉमर्स कॉलेजमध्ये सत्कार

CD

87981
कोल्हापूर : कॉमर्स महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. याप्रसंगी उपस्थित मान्यवर.

‘कॉमर्स’मध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : ‘स्पर्धेच्या युगामध्ये ज्यांचा पाया मजबूत आहे, त्यांना यशापासून कोणीही रोखू शकत नाही,’ असे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक यांनी सांगितले.
कॉमर्स कॉलेजमध्ये बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. नाईक बोलत होते. ते म्हणाले, ‘आई-वडील आणि गुरुजनांनी केलेले संस्कार कधीही विसरू नका.’ कनिष्ठ विभागाचे समन्वयक प्रा. बी. डी. डवंग यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कॉलेजचा निकाल ९८.७३ टक्के लागला होता. यामध्ये यश मिळविलेल्या बलभीम कोकाटे, अनुश्री बारटक्के, श्रुती मगदूम, सुरभी केसतीकर, स्नेहा साळुंखे, प्रणिता दळवी, मसिरा सुभेदार यांसह अन्य गुणवंतांचा सन्मान करण्‍यात आला. बलभीम कोकाटे, सुरभी केसतीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
संस्थेच्या अध्यक्षा राजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्‍वनाथ मगदूम, सदस्य ॲड. वैभव पेडणेकर, ॲड. अमित बाडकर यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रा. स्वाती पोवार यांनी स्वागत केले. प्रा. अश्‍विनी मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुषमा पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT