कोल्हापूर

चाफ्याची भाव परिसरात दुर्गंधी

CD

चाफ्याची भाव परिसरात दुर्गंधी
आजरा-महागाव मार्गावर वाहनधारकांना त्रास : मृत जनावरे, कोंबड्यांचा खच
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ९ : आजरा-महागाव मार्गावर चाफ्याची भाव परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथे मृत जनावरे, कोंबड्या, खराब झालेली अंडी, यांसह खराब झालेल्या प्लास्टिकच्या वस्तू व उपकरणे टाकली जात आहे. जनावरे, कोंबड्या कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटल्याने या परिसरातून ये-जा करणे अडचणीचे झाले असून, वाहनधारकांना त्रास होत आहे. याबाबत कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व होनेवाडी ग्रामपंचायतीकडून केली जात आहे.
आजरा-महागाव मार्गावरील ग्रामपंचायत हद्दीनजीक चाफ्याची भाव परिसर येतो. रस्त्याच्या बाजूचा एक भाग खोलगट या बाजूला असल्याने त्याचा फायदा काही जण घेत आहेत. येथे मृत जनावरे, कोंबड्या, खराब झालेली अंडी टाकली जात आहेत. वैद्यकीय कचरा, प्लास्टिकही टाकल्यामुळे हा परिसर कचऱ्याचे आगर झाला आहे. मृत जनावरे व कोंबड्या कुजल्या की, येथे भयंकर दुर्गंधी पसरते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना त्‍याचा त्रास होत आहे.
-------------
तारेच्या कंपाऊंडची मागणी
वनविभाग आजरामार्फत येथे सूचना फलक लावले असले तरी मृत जनावरे, कोंबड्या टाकण्याचे प्रकार कायम आहेत. याबाबत होनेवाडी ग्रामपंचायतीमार्फत वनविभागाकडे तक्रार केली असतानाही दोषींवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे होनेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य कृष्णा पाटील यांनी सांगीतले. असे प्रकार करणाऱ्यांवर वनविभागाकडून दंडात्मक कारवाई व्हावी. तसेच या परिसरात कायमचे तारेचे कंपाऊंड करावे, अशी मागणी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीकडून केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT