कोल्हापूर

मोदींच्या तिसऱ्यांदा निवडीने आजरा तालुक्यात आनंदोत्सव

CD

मोदींच्या तिसऱ्यांदा निवडीने
आजरा तालुक्यात आनंदोत्सव

सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ११ ः नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आजरा शहरासह तालुक्यात आनंदोत्सव साजरा केला. मोदींच्या विजयाच्या घोषणा देत आजरा शहरातून रॅली काढण्यात आली. आजऱ्यासह पेरणोली, मलिग्रे, उत्तूरसह गावागावांत फटाक्यांची आतषबाजी व साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
आजरा तालुका भाजपच्या वतीने येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर आनंदोत्सव साजरा केला. आजरा अर्बन बॅंकेचे संचालक डॉ. दीपक सातोस्कर यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. यावेळी साखर-पेढ्यांचे वाटप केले. भाजपचे तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, गौतम भोसले, शुभम पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आजरा तहसीलदार कार्यालयासमोरून रॅली निघाली. रॅलीत सुधीर कुंभार, आनंदा कुंभार, अरुण देसाई आदी सहभागी होते. मलिग्रे (ता. आजरा) येथे फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. महिलांच्या लेझीम पथकासह गावात रॅली काढून साखर-पेढे वाटप केले. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष समीर पारदे, विष्णू जाधव, अनिल कागिनकर, नाना नेसरीकर आदी उपस्थित होते. पेरणोली (ता. आजरा) येथे साखर-पेढे वाटण्यात आले. यावेळी जयवंत येरुडकर, मुकुंदराव कांबळे, गोविंद जाधव आदी उपस्थित होते.
......

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT