कोल्हापूर

आप निवेदन

CD

कोल्हापूर : महावितरणने वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लागू करू नये, या मागणीचे निवेदन मुख्य अभियंता परेश भागवत यांना देताना आम आदमी पक्षाचे शिष्टमंडळ.

स्मार्ट प्रीपेड मीटर
लागू करू नका
‘आप’ची मागणी; महावितरणला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : महावितरणने वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लागू करू नये, या मागणीचे निवेदन आम आदमी पक्षातर्फे (आप) मुख्य अभियंता परेश भागवत यांना आज येथे देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, राज्यातील जनतेचे आर्थिक शोषण करण्याचे काम शासन व एमएसईडीसीएल यांच्या साह्याने देशातील काही भांडवलदारी कंपन्या करत आहेत. स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध होत आहे. सरकारकडून ऑगस्ट २०२१ मध्ये हा कायदा भांडवलदारी कंपन्यांना फायदा व्हावा, या हेतूने पारित केल्याचे निदर्शनास येत आहे. जनतेवर वाढीव बोजा टाकण्याचे षड्‌यंत्र २०२१ पासून नियोजित होते. वीस किलो व्हॅट किंवा सत्तावीस हॉर्स पॉवरपेक्षा कमी विद्युत दाब असणारे विद्युत उपभोक्ता म्हणजेच सर्वसामान्य कुटुंबे, गोरगरीब जनता, शेतकरी, लघू उद्योजक, व्यावसायिक यांच्यावर जाणीवपूर्वक अन्यायकारक धोरण ठरवून घेतलेला हा निर्णय आहे. मार्च २०२५ पर्यंत स्मार्ट मीटर लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. यात जनतेचे नुकसान आहे. राज्य शासन दोन कोटी २५ लाख ६५ हजार विद्युत मीटर बदलण्याच्या तयारीत आहे. वेळप्रसंगी जनतेच्या न्याय आणि हितासाठी आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल.
शिष्टमंडळात प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, शहराध्यक्ष उत्तम पाटील, किरण साळोखे, अभिजित कांबळे, मयूर भोसले, समीर लतीफ, अभिजित देसाई, उमेश वडर, स्वप्निल काळे यांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT