कोल्हापूर

शंभर हेक्टरवर होणार आजरा घनसाळ लागवड

CD

ajr33.jpg..
94665
पेरणोली (ता. आजरा) ः येथे भात रोपलावणी करताना शेतकरी.
--------
शंभर हेक्टरवर होणार आजरा घनसाळ लागवड
कृषी विभागाचा अहवाल ः रोपवाटिका तयार, रोपलावणीला सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३ ः तालुक्याची खासियत असलेला व जीआय मानांकन प्राप्त आजरा घनसाळची यंदा शंभर हेक्टरवर लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. शेतकऱ्यांनी आजरा घनसाळची रोपवाटिका तयार केल्या आहेत. पोळगाव परिसरात भात रोपलावणीला सुरुवात झाली आहे. पावसाचे सातत्य कायम राहिल्यास रोपलावणीला वेग येणार आहे.
तालुक्यात खरीपचे २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ९ हजार ८०० हेक्टरवर भात पीक घेतले जाते. तीस वर्षांपूर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणात देशी वाण घेतले जात होते. यामध्ये घनसाळ, काळाजिरगा, कोतमीरसाळ, चंपाकळी यांसह विविध प्रकारची सुवासिक भाताच्या वाणाचे उत्पादन घेतले जात होते. देशी वाणाचे उत्पादन कमी व दरही विशेष मिळत नसल्याने या काही वर्षात शेतकरी संशोधित, सुधारित व संकरित भाताच्या जातीकडे वळल्याने त्याची लागवड वाढली. त्यामुळे आजरा घनसाळ, काळा जीरगा अशी वाण अस्तंगत होण्याची भीती व्यक्त होत होती. २००८ मध्ये जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, शासनाचा कृषी विभाग व आजरा तालुका शेतकरी मंडळाने घनसाळसह अन्य देशी वाण वाचवण्याची चळवळ हाती घेतली. जिल्हा परिषदेने बळीराम देसाई देशी वाण योजनेतंर्गत अनुदानही दिले. त्यामुळे तालुक्यातील घनसाळ भाताचे क्षेत्र वाढले. आठ वर्षांपूर्वी या भाताला जीआय मिळाला आहे. मागणीबरोबर दरही वाढल्यामुळे आजरा घनसाळ भाताच्या क्षेत्रामध्ये तालुक्यात सातत्य कायम राहिले आहे. अमोघ, दप्तरी, वाडा कोलम, शुभांगी, अमन, चिंटू, वायएसआर, एचएमटी सोना, बीपीटी, ५२०४, कोमल, अमानी यांसह विविध संकरित, सुधारित जातीची लागवड शेतकरी करणार असले तरी घनसाळची सुमारे शंभर हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे.
घनसाळची तालुक्यात ३२ गावांमध्ये लागवड होते. यंदा दाभिल, पोळगावमध्ये प्रत्येकी शंभर एकरहून अधिक लागवड होणार आहे. तालुक्यात दमदार पाऊस पडत आहे. ओढे, नाले व नद्यांना पाणी आले आहे. भात खाचरामध्ये पाणीच पाणी झाले आहे. घनसाळची रोपवाटिका (तरवे) एकवीस दिवसाचे झाले आहेत. त्यामुळे भात रोपलावणीला सुरुवात झाली आहे.
---------
दरवर्षी इंद्रायणी भाताला चांगला दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी इंद्रायणी भाताची लागवड करण्यात भर दिला होता. यंदा इंद्रायणीची मागणी घटली त्याचबरोबर दरही चांगला मिळाला नाही. आजरा घनसाळला दर चांगला राहिला त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे शेतकरी घनसाळ लागवडीकडे वळला आहे. पोळगावमध्ये सुमारे सव्वाशे ते दीडशे एकर क्षेत्रावर घनसाळ लागवड होणार आहे.
- जयसिंग नार्वेकर, घनसाळ उत्पादक शेतकरी, पोळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT