कोल्हापूर

छत्रपती शिवाजी मार्केटमधील पाच गाळे इस्टेट विभागाकडून सील

CD

94668
कोल्हापूर : सवलत योजनेमध्ये थकीत भाडे न भरलेल्या गाळेधारकांचे गाळे सोमवारी महानगरपालिकेच्या इस्टेट विभागातर्फे सील करण्यात आले.

छत्रपती शिवाजी मार्केटमधील
पाच गाळे पालिकेकडून सील
सवलत योजनेतील थकीत भाडेप्रश्‍नी कारवाई
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः सवलत योजनेमध्ये थकीत भाडे भरलेले नाही अशा पाच गाळेधारकांचे गाळे सोमवारी महानगरपालिकेच्या इस्टेट विभागातर्फे सील करण्यात आले. छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये कारवाई करण्यात आली.
महानगरपालिका मालकीच्या ए, बी, सी, डी आणि ई वॉर्डच्या विविध मार्केटमधील २०१५-१९ आणि २०१९-२४ भाडे दंड अथवा व्याजामध्ये सवलत योजना राबवून भाडे भरून घेण्याची कार्यवाही १४ जून अखेर सुरू होती. या सवलत योजनेमध्ये १३९२ भाडे करार मुदत संपलेल्या गाळेधारकांपैकी ५०८ गाळेधारकांनी थकीत भाडे भरून दंड अथवा व्याजावरील सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र, ज्या गाळेधारकांनी सवलत योजनेमध्ये थकीत भाडे भरलेले नाही, अशा गाळेधारकांचे गाळे सोमवारी सील करण्याची मोहिम राबविण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी मार्केटमधील पाच गाळे सील करण्यात आले. ही मोहीम प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपआयुक्त साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. त्यामध्ये इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, सहायक अधीक्षक मकरंद जोशी, कनिष्ठ लिपिक गिरीश नलवडे, कल्पना शिरदवाडे, आकाश शिंदे, विष्णू चित्रुक, सदानंद फाळके यांनी भाग घेतला.
--------------
चौकट
कारवाई सुरूच राहणार
दरम्‍यान, ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असलेने थकबाकीदार गाळेधारकांनी त्यांची थकबाकी त्वरीत महानगरपालिकेकडे भरून सहकार्य करावे, असे आवाहन इस्टेट विभागातर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT