कोल्हापूर

आरोग्य सर्वेक्षणात ९२ घरांत आढळल्या डेंग्यू डासांच्या अळ्या

CD

94680
कोल्हापूर : डेंग्युच्या पार्श्‍वभुमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे २५२२ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.


शहरातील ९२ घरांत
डेंगी डासांच्या अळ्या
आरोग्य विभागातर्फे सर्व्हेक्षण; प्रतिबंधात्मक कार्यवाही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : डेंगीच्या पार्श्‍वभुमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सोमवारी घरोघरी जाऊन २५२२ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यावेळी सर्वेक्षणामध्ये ९२ घरांमध्ये डेंगीच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या. त्याठिकाणी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली.
शहरातील सरदार तालीम, फिरंगाई मंदीर, शिवाजीपेठ, राजारामपुरी, यादवनगर, शाहूनगर, शाहूपुरी, मातंग वसाहत, दौलतनगर, जागृतीनगर, प्रतिभानगर, सम्राटनगर, पांजरपोळ, पाटोळेवाडी, निंबाळकर मार्ग, न्यू शाहूपुरी, ताराबाई पार्क, कनाननगर, नाना पाटीलनगर, बोंद्रे नगर, आपटेनगर, वाशी नाका, दत्त चिले कॉलनी, रुईकर कॉलनी, माकडवाला वसाहत, टेंबलाईवाडी, टाकाळा, नेहरुनगर, सुभाषनगर, जवाहरनगर, नागाळा पार्क, शिवाजी पार्क या परिसरात आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये विविध ९२ घरांमध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या दिसून आल्या. त्यात काही घरातील या अळ्या असलेले पाणी ओतून देण्यात आले, तर काही ठिकाणी अळ्यानाशक औषध फवारण्यात आले. महापालिकेतर्फे पावसाळा संपेपर्यंत आरोग्य सर्वेक्षण केले जाणार आहे. डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी महापालिकेने केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्यअधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT