कोल्हापूर

CD

सेवा हमी कायद्याचा
पायलट प्रोजेक्ट कोल्हापुरातून
आमदार आबिटकर यांच्या लक्षवेधीवर शंभूराज देसाई यांची माहिती

कोल्हापूर, ता. ३ : ‘राज्यात सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी तत्काळ कारवाई केली जाईल. याचा पायलट प्रोजेक्ट कोल्हापूरमध्ये करण्यात येईल. त्याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने केली जाईल,’ अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी अधिवेशनात दिली. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा अत्यंत चांगला असतानाही, त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नसल्याचे सांगत याप्रकरणी सकारात्मक कारवाई करण्याची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली होती.
यावेळी बोलताना आबिटकर म्हणाले, ‘एका चांगल्या कायद्याची कशी बोळवण केली जाते, याचा नमुना म्हणून या कायद्याकडे पाहिले पाहिजे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यात मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत मोठी उदासिनता आहे. याचा थेट परिणाम राज्यातील १२ कोटी जनतेवर होत आहे. कागदपत्रे देण्यात मोठी दिरंगाई करण्यापासून ते अर्थकरणापर्यंत अनेक कारणांनी सर्वसामान्य जनतेची अडवणूक केली जात आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेच्या कामासाठी आग्रही असताना, कर्मचारी व अधिकारी या कायद्याबाबत गंभीर नाहीत. या सर्व प्रकाराची दखल घ्यावी.’
यावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ‘या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आजच मुख्य सचिवांना सूचना देण्यात येतील. तसेच दर महिन्याला याचा आढावाही घेतला जाईल. त्याचबरोबर या लोक सेवा कायद्याच्या अंमलबजावणीची सुरुवात कोल्हापूरमधून करण्यात येईल.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT