कोल्हापूर

एसटी प्रवासी राजा

CD

‘एसटी’ राबविणार प्रवासी राजा दिन
प्रवाशांच्या तक्रारी जाणून घेणार; आगारनिहाय विभाग नियंत्रकांची भेट

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर , ता. ४ ः एसटी प्रवासाविषयी प्रवाशांच्या तक्रारी, समस्या जाणून घेण्यासाठी एसटी महामंडळातर्फे राज्यभर ‘प्रवासी राजा दिन’ असा उपक्रम चालविण्यात येणार आहे. यात एसटीचे विभाग नियंत्रक दर आठवड्याला एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, सूचना जाणून घेतील. प्रवाशांच्या शंकांचे निरसन करतील, असे त्याचे स्वरूप आहे. त्यानुसार १५ जुलैपासून शुक्रवार व सोमवार असे दोन वार निश्चित केले आहेत.
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांची ही संकल्पना आहे. एसटी महामंडळाच्या सेवेतून रोज ५४ ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यातील काही प्रवाशांना एसटी सेवेविषयी अनेक शंका असतात. कधी तक्रारी असतात. मात्र त्याची माहिती कोठे, कोणाकडे द्यावी, तसेच त्याची दखल घेतली जाईल, की नाही याविषयी शंका असते. अशा स्थितीत प्रवाशांना बसस्थानक, तेथील प्रसाधनगृहे स्वच्छ असावीत, निर्जंतुकीकरण केलेले असावे, अशी प्रवाशांची अपेक्षा असते. एसटी बस वेळेत मार्गस्थ व्हाव्यात, ठरलेल्या थांब्यावर बस थांवून प्रवासी घ्यावेत किंवा उतरावेत, चालक-वाहकांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे आदी अपेक्षा प्रवाशांच्या असतात. मात्र यात अनियमितता असल्यास प्रवाशांना तक्रार करता येते. यासंबंधी प्रवाशांच्या शंकांचे निरसन व्हावे, स्थानिक समस्या स्थानिक पातळीवरच सोडविल्या जाव्यात, प्रवाशांना समाधानकारक सेवा मिळावी यासाठी वरील उपक्रम राबविण्यात येणार आहे.

चौकट
प्रवाशांनी लाभ घ्यावा...
एसटी महामंडळाच्या प्रत्येक आगारात सकाळी १० ते २ या वेळेत विभाग नियंत्रक प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना जाणून घेतील. आठवड्यातील सोमवार व शुक्रवारी या दोनच दिवशी उपक्रम असणार आहे. यातून एसटी सेवेची गुणवत्ता व दर्जा सुधारला जावा, अशी अपेक्षा आहे, त्याचा प्रवाशांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी जनसंपर्क विभागाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT