कोल्हापूर

शिष्यवृत्ती परीक्षेत यश

CD

शिष्यवृत्ती परीक्षेत यश
------------------
ich42.jpg
94778
इचलकरंजी : शिष्यवृत्ती परीक्षेतील सरस्वती हायस्कूलमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी अमरसिंह माने, पी. डी. शिंदे, शिवाजी जगताप, आदी.

सरस्वती हायस्कूल
इचलकरंजी : शिष्यवृत्ती परीक्षेत सरस्वती हायस्कूलने यश प्राप्त केले. आठवीचे नऊ व पाचवीचे तीन असे १२ विद्यार्थी शिष्यवृत्तीपात्र ठरले. आठवीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी असे, गार्गी खारगे, तनिष्का महिंद, आदित्य बंडगर, श्रुतिका मोहोळे, शंभूराजे सरनोबत, अनुष्का डांगरे, श्रावणी चौगुले, समृद्धी गांजवे, आसावरी सोडगे. पाचवी : समर्थ कुडाळकर, आराध्या पाटील, विराज लोले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पी. डी. शिंदे, पर्यवेक्षिका आर. एन. जाधव, एस. आर. दिवटणकर, एम. के. खोत, आदींचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थाध्यक्ष अमरसिंह माने, सचिव शिवाजीराव जगताप, सहसचिव पृथ्वीराज माने यांच्या हस्ते करण्‍यात आला. एस. पी. पाटील यांनी सूत्रंचालन केले. आभार पर्यवेक्षक पी. जी. हजगुळकर यांनी मानले.
-------------
09068
विघ्नेश संकपाळ
विघ्नेश संकपाळचे यश
इचलकरंजी : येथील विघ्नेश संकपाळ याने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत शहरात प्रथम क्रमांक पटकावला. सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिरचा विद्यार्थी आहे. त्याने राज्य गुणवत्ता यादीत ११ वा, तर इचलकरंजी शहरस्तरीय गुणवत्ता यादीत २७४ गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याला संस्थेचे संस्थापक सुधाकरराव मणेरे, मुख्याध्यापिका पुष्पा ऐनापुरे, आई वर्षा संकपाळ, योगेश संकपाळ, बबन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
----------
आजरा हायस्कूल
आजरा : येथील आजरा हायस्कूलने आठवी व पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले. आठवीमध्ये १३ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. चार विद्यार्थ्यांना राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे. अक्षता कांबळे राज्यात १० वी आली आहे. राजेश पाटील, गतिमा आडकुरकर राज्यात सोळावी, तर खादिजा मुल्ला हिने १८ वा क्रमांक मिळवला आहे. चैत्राली पाटील, वैष्णवी पाटील, श्रावणी पाटील, गीतांजली पाटील, आर्यन सबनीस, अनुष्का निर्मळे, आशुतोष वांद्रे, सिद्धेश गुरव, ज्ञानेश्वरी येसणे यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत अथर्व बडे राज्यात ११ वा आला आहे. सक्षम खवरे राज्यात १५ वा, तर आराध्य कांबळे १९ वा आला आहे. श्रीराम पटेकर, आरव पाटील, समीक्षा पाटील, स्वरा चोडणकर, पराग पाटील, आदिती यादव, रोचक पाटील यांनी यश मिळवले. येथील राहत अनिस नाईकवाडे हीने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उर्दू माध्यमातून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. डॉ. झाकीर हुसेन अॅंग्लो ऊर्दू हायस्कूलची ती विद्यार्थींनी आहे. महमद तगारे व सलीम शेख यांनी तिला मार्गदर्शन केले.
----------
अनुष्का पोटे राज्यात सहावी
उत्तूर : येथील श्री पार्वती
शंकर विद्यामंदिर व विद्यालयातील पाचवी व आठवीचे दहा विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत आले. आठवीमधील अनुष्का पोटे या विद्यार्थिनीने ९१.३३ टक्के गुण घेऊन राज्यात सहावा क्रमांक मिळवला. शाळेतील अथर्व भाटले, गौरी भिउंगडे, ओम सुतार, आर्या घोरपडे, श्रेया खोराटे, हर्षवर्धन लकांबळे, अवधूत कुराडे, आर्या खोराटे शिष्यवृत्तीधारक झाले. पाचवीमधून श्रीया बोटे शिष्यवृत्तीधारक ठरली. वर्गशिक्षक पी. एन. केसरकर, मुख्याध्यापक एम. यू. शिकलगार, वैशाली पाटील, बी. बी. पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT