कोल्हापूर

ऋषीतुल्य व्यक्तीमत्व

CD

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) वाढदिवस विशेष-----आठ कॉलम रिव्हर्स पट्टी

94834

ऋषितुल्य व्यक्‍तिमत्त्‍व

राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक आणि सहकार असा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणून माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या आजच्या प्रगतिशील वाटचालीत आपापल्या विभागाचा सर्वांगीण विकास करणारे जे ठराविक नेते आहेत, त्यामध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. इचलकरंजीसह परिसराचा सहकारी संस्थांच्या माध्यमातून कायापालट करणारे ऋषितुल्य व्यक्‍तिमत्त्‍व असलेल्या आवाडेदादांचा आज ९३ वाढदिवस साजरा होत आहे.
-प्रकाश दत्तवाडे, अध्यक्ष, ताराराणी पक्ष, इचलकरंजी विधानसभा
----------
आवाडेदादांचा जन्म ५ जुलै १९३१ रोजी झाला. त्यांचे कुटुंब शेतकरी. त्यांचे शिक्षण इचलकरंजीमध्येच झाले. घरची शेती आणि यंत्रमाग व्यवसाय करीत समाजकार्य करण्यास सुरुवात केली. त्यातूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली. इचलकरंजीतील काँग्रेसचे त्या काळातील नेते दत्ताजीराव कदम, दे. भ. बाबासाहेब खंजिरे, राजाभाऊ दातार, सुभेदार काका यांच्या नेतृत्वाखाली आवाडेदादांनी काँग्रेस पक्षाचे कार्य सुरू केले. इचलकरंजी नगर परिषदेत नगरसेवक, त्यानंतर नगराध्यक्ष झाले. त्यांनी शहराचा विकास अतिशय चांगल्या पध्दतीने केला. जनतेच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. दत्ताजीराव कदम आणि अनंतराव भिडे यांच्याकडून सहकाराचे ज्ञान घेऊन १९६३ मध्ये त्यांनी इचलकरंजी जनता सहकारी बँकेची स्थापना केली. याच बँकेचे आजमितीला वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
सहकार क्षेत्रात काम करत असताना कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रांत अतुलनीय काम केले. त्यानंतर त्यांना आबासाहेब खेबुडकर, वसंतरावदादा पाटील, यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याचाच फायदा त्यांना सहकार क्षेत्रात काम करीत असताना झाला आणि त्यामध्ये त्यांनी प्रचंड भरारी घेतली. १९८० मध्ये विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी मतदारसंघातून विजय मिळवून ते आमदार झाले व वसंतरावदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात उद्योग व नगरविकास राज्यमंत्री म्हणून कार्यरत झाले. मंत्रिपदाच्या कारकिर्दीत इचलकरंजीच्या यंत्रमाग व्यवसायाच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेऊन वस्रोद्योग व्यवसाय वाढीस नेला. त्यामुळे इचलकरंजी शहराचा विकासही झाला. १९८१ मध्ये दत्ताजीराव कदम टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणजेच `डीकेटीई` या संस्थेची स्थापना केली. इचलकरंजीच्या वस्रोद्योगास पूरक असणाऱ्या या संस्थेने देशभरात टेक्स्टाईल व इंजिनिअरिंग तसेच शिक्षण क्षेत्रात नाव कमवले. प्राथमिक शिक्षणापासून पीएच.डी.पर्यंतची शिक्षण सुविधा निर्माण करण्याचे महत्त्‍वपूर्ण काम त्यांनी या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले. इतके करून न थांबता त्यांनी इचलकरंजी को-ऑप. स्पिनिंग मिल म्हणजेच आयको, नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी तसेच देशातील पहिली इंदिरा महिला सहकारी सूतगिरणी उभारून महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवन सुखी, समृद्ध करण्याचे अतिशय मोलाचे काम त्यांनी केले.
समाजकारण, राजकारण करीत असताना त्यांनी इचलकरंजीच्या सांस्कृतिक व कला क्षेत्रांमध्येही कार्य केले. मराठी साहित्य संमेलन व नाट्य संमेलन ही इचलकरंजीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मानाचे तुरे समजले जातात. या दोन्ही संमेलनांची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. इचलकरंजी व परिसरातील युवकांची कौशल्य क्षमता ओखळून चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने व शेतकरी यांचा ऊस गळीत लवकरात लवकर व्हावा म्हणून १९९२ मध्ये त्यांनी हुपरी येथे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. आज सहकार क्षेत्रातील जवाहर साखर कारखाना महाराष्ट्रासह देशामध्ये उच्चांकी ऊस गाळप करणारा साखर कारखाना म्हणून नावारूपाला आला आहे. देशातील सहकारी साखर उद्योगामध्ये जवाहर साखर कारखान्याचे नाव अग्रस्थानी आहे. राज्य व देश पातळींवरील विविध संस्थांकडून अनेक पारितोषिके जवाहर साखर कारखान्यास प्राप्त झाली आहेत. आवाडेदादांनी ज्या संस्था निर्माण केल्या त्या देशभरात नावारूपास आल्या आहेत.
आवाडे दादा १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून येऊन खासदार झाले. सहकाराच्या माध्यमातून अनेक संस्थांची उभारणी त्यांनी केली याची पोचपावती म्हणून त्यांना देश पातळीवरील नॅशनल शुगर फेडरेशन या संस्थेच्या अध्यक्षपदी व जागतिक बिट आणि ऊस उत्पादक संस्थेच्या उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली. शांत, संयमी आणि सर्वांना समजून घेऊन सर्वांसाठी झटण्याची वृत्ती, निर्व्यसनीपणा, चारित्र्य संपन्नता, वक्तशीरपणा अशा विविध गुणांमुळे त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व बहरलेले आहे. सहकारी संस्थांची उभारणी कशी करावी आणि त्या संस्था कोणत्या पध्दतीने चालवाव्यात व नावारूपाला आणाव्यात याचा आवाडेदादा यांच्याकडून आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांचे कार्यकर्तृत्वामुळे त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्यांच्यामुळे इचलकरंजी व परिसराची शान वाढली आहे. त्यांचे वारसदारही त्यांच्या पाऊलांवर पाऊल ठेवून काम करीत आहेत. प्रकाशआण्णा विद्यमान आमदार असून, ते माजी वस्रोद्योगमंत्री आहेत. प्रकाशआण्णांनी राजकारणात, समाजकारणात व सहकार क्षेत्रांत चांगले काम करून आपला ठसा उमठवला आहे. तर दुसरे चिरंजीव राजूआण्णा म्हणेज उत्तम आवाडे हे व्यवसाय व शेती सांभाळून समाजकारण करीत असतात. त्याचबरोबर आवाडेदादांचे नातू जिल्हा परिषद माजी सदस्य डॉ. राहुल आवाडे हे तरुणांचे उमदे नेतृत्व असून स्वप्निल आवाडे हे कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत.
आवाडेदादा यांच्याकडे कामासाठी आलेली प्रत्येक व्यक्ती हसतमुखाने काम करून घेऊन जातात. कोणीही नाराज होणार नाही याची पूर्ण दक्षता संपूर्ण आवाडे कुटुंबीय घेत असतात. एकंदरीत आवाडेदादांचे कुंटुंब म्हणजे ‘गोकुळ’च आहे. अशा या अजातशत्रू व्यक्‍तिमत्त्‍वाच्या आवाडेदादांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा....!
-----
पुरवणी संकलन : पंडित कोंडेकर (इचलकरंजी), बाळासाहेब कांबळे (हुपरी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT