कोल्हापूर

अडीच कोटींची रक्कम गोठविण्यासाठी प्रयत्न

CD

अडीच कोटींची रक्कम गोठविण्यासाठी प्रयत्न
शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिक हरेष गोवर्धनदास चंदवाणी (वय ६२, रा. ताराबाई पार्क) यांची ॲव्हेन्डस स्पार्क नावाच्या कंपनीकडून अडीच कोटींची फसवणूक झाली आहे. ही रक्कम वेगवेगळ्या १३ खात्यांवर वर्ग झाल्याचे समोर आल्याने ही रक्कम गोठविण्यासाठी सायबर पोलिस प्रयत्नशील आहेत. यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा व बॅंकांशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले.
एप्रिल २०२४ ते २८ जून २०२४ कालावधीत चंदवाणी यांनी व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून शेअर मार्केटशी संबधित कंपनीकडे गुंतवणूक केली होती. पाच वेगवेगळ्या व्यक्तींनी त्यांच्यासोबत बोलणे करून दोन कोटी ५१ लाख ३९ हजार २९१ रुपये भरून घेतले. मात्र, याचा कोणताही परतावा मिळाला नाही. केवळ त्यांच्या ई वॉलेटमध्येच ही रक्कम दिसत होती. परतावा मिळत नसल्याने तसेच संबंधित व्यक्तींचा संपर्क बंद झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. हा तपास सायबर पोलिसांकडून सुरू करण्यात आला असून पैसे वर्ग झालेली खाती गोठवून व्यवहार थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच त्यांना संपर्क करणाऱ्या व्यक्तींचे मोबाईल क्रमांक कोणत्या राज्यातील आहेत, याची माहिती घेऊन तपास गतिमान करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT