कोल्हापूर

‘जीएसटी’मध्ये कोल्हापूरकडून नाविन्यपूर्ण काम व्हावे

CD

‘जीएसटी’मध्ये कोल्हापूरकडून
नावीन्यपूर्ण काम व्हावे

अप्पर राज्यकर आयुक्त किरण नांदेडकर यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः ‘वस्तू व सेवाकरामध्ये (जीएसटी) कोल्हापूर विभागाकडून नावीन्यपूर्ण आणि दिशादर्शक कार्य व्हावे’, अशी अपेक्षा अप्पर राज्यकर आयुक्त किरण नांदेडकर यांनी व्यक्त केली. जीएसटी भवन कोल्हापूरमध्ये जीएसटी दिनानिमित्त आयोजित कार्यगौरव सोहळा आणि विविध कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात राज्यकर आयुक्त आशिष शर्मा यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. राज्यकर सहआयुक्त सुनीता थोरात यांनी जीएसटी करसंकलन, वसुली आणि वार्षिक लक्ष्यांक याबाबतीत कोल्हापूर विभाग महाराष्ट्रात अग्रेसर असल्याचे सांगितले. सर्वाधिक करभरणा करणाऱ्या पाच करदात्यांना सन्मानित करण्यात आले. वर्षभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन कार्यगौरव करण्यात आला. नादब्रम्ह संगीत गुरुकुलचे अमोल राबाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संगीतधारा बहारदार सांगितिक कार्यक्रम सादर केला. दरम्यान, डॉ. लाल पॅथ लॅब आणि नंदादीप रुग्णालयातर्फे रक्त आणि नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. सीपीआर रुग्णालयातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात २७ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT