कोल्हापूर

‘आयजीएम’मध्ये ५० रुग्णांवर प्लास्टीक सर्जरी

CD

‘आयजीएम’मध्ये ५० रुग्णांवर प्लास्‍टिक सर्जरी
इचलकरंजी, ता. ५ : आयजीएम रुग्णालयात रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी, रोटरी ॲन्स इचलकरंजी आयोजित व दगडूलाल मर्दा फाउंडेशन, नारायणदास दामोदर भंडारी फाउंडेशन (मुंबई, इचलकरंजी, बेळगाव), गिरिराज मदनगोपाल मोहता, गोयंका फाउंडेशन, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० ट्रस्टच्‍या सहकार्याने प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित केले होते. शिबिरामध्ये विविध प्रकारांतील ५० रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या.
शिबिराचे उद्‌घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्या उपस्थितीत केले. शिबिरात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, बेळगाव, विजापूर, सातारा, पुणे, आदी जिल्ह्यांतील रुग्ण उपस्थित होते. त्यांची पूर्व प्राथमिक तपासणी करून ५० रुग्णांवर शस्त्रक्रिया केली. यामध्ये ओठ, टाळू, भाजलेले व्यंग, चेहऱ्याची विद्रुपता, जुळलेली बोटे, स्नायूंचा आखडलेपणा, आदी रुग्ण सहभागी झाले होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदकुमार बनगे, इनरव्हील डिस्ट्रिक्टच्‍या चेअरमन वैशाली लोखंडे, कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया करणारे डॉ. एस. पी. बजाज (दिल्ली), डॉ. रवींद्र ताह (लुधियाना), डॉ. राजेंद्र गांधी (पुणे), डॉ. पीयुष दोषी (बडोदा), डॉ. गझलबेन पटेल (बडोदा), रेणू बजाज (दिल्ली), आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT