कोल्हापूर

न्यूटनच्या अजिंक्य पाटीलच्या कार्यालयातून संगणक जप्त

CD

फोटो 94924

‘न्यूटन’च्या अजिंक्य पाटीलच्या
कार्यालयातून संगणक जप्त

पोलिसांकडून झडती; मोबाईलही जप्त

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘सीपीआर’ला ५ कोटी १७ लाख ६३ हजारांचा औषधांचा पुरवठा करणाऱ्या अजिंक्य अनिल पाटील (वय ३०, रा. त्रिमूर्ती कॉलनी, कळंबा, ता. करवीर) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने त्याच्या वाय. पी. पोवार नगरातील कार्यालयाची झडती घेत संगणक, मोबाईल व काही कागदपत्रे जप्त केली. पोलिस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
संशयित अजिंक्य पाटील याने शौर्य मेडिकल अँड डिस्ट्रिब्युटर्स यांच्या नावे असणाऱ्या मूळ परवान्याचा गैरवापर करत न्यूटन एंटरप्रायजेसचे खोटे व बनावट इंटिमेशन लेटर तयार करून ‘सीपीआर’ला औषधे व साहित्य पुरवठा केल्याचे उघडकीस आले होते. याकामी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचा खोटा शिक्का, सहायक आयुक्त (औषधे) यांची बनावट स्वाक्षरी करून शासनाची फसवणूक करत ५ कोटी १७ लाख ६३ हजार ४४० रुपयांचा ठेका मिळवला होता. याप्रकरणी २३ मार्च २०२४ ला लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक पवार यांनी त्याला अटक केली. पोलिस कोठडीदरम्यान त्याने सादर केलेली खोटी कागदपत्रे स्वतःच्या कार्यालयातच बनविल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी त्याच्या वाय. पी. पोवार नगरातील कार्यालयाची झडती घेत संगणक, मोबाईल व कागदपत्रे जप्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT