कोल्हापूर

पोलिसवृत्त

CD

भरतीवेळी
दोघे जखमी

कोल्हापूर ः भारत राखीव बटालियन भरतीवेळी भोवळ येऊन पडल्याने दोघांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. श्रीधर दिलीप जाधव (वय २४, रा. यवलूज, पन्हाळा) व अक्षय नामदेव पेटकर (वय २६, रा. पेठ नाका, वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. शुगर मिल कॉर्नरनजीक हा प्रकार घडला. दोघांवर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
................
गाडी आडवी
मारल्याच्या
रागातून हाणामारी

कोल्हापूर ः गाडी आडवी मारल्याची विचारणा केल्याच्या रागातून लाईन बाजार परिसरात हाणामारीचा प्रकार घडला. मारहाणीत आदित्य मिलिंद लाड (वय २५, रा. शिवतेज चौक, लाईन बाजार) व प्रतिक गजानन मुतगेकर (वय २६, रा. लाईन बाजार) हे दोघे जखमी झाले. लोखंडी गजाने केलेल्या मारहाणीत आदित्यच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, पंधराहून अधिक टाके पडल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी सौरभ दीपक पडवळे व दीपक पडवळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रतिक मुतगेकर याने दिलेल्या फिर्यादीवरून लाड यांच्याविरोधात लोखंडी गज मारून जखमी केल्याचा परस्परविरोधी गुन्हा दाखल केला. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
......................
केएमटी अपघातात
महिला जखमी

कोल्हापूर ः मध्यवर्ती बसस्थानक परिसरात झालेल्या केएमटी अपघातात प्रवासी महिला जखमी झाली. योगिता मिलिंद बरगे (वय ४०, रा. रूकडी, हातकणंगले) असे महिलेचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी हा अपघात घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.
...................
चिमुकलीला
विजेचा धक्का

कोल्हापूर ः गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे खेळताना विजेचा धक्का लागून प्रांजल श्रीकांत कांबळे (वय १०) जखमी झाली. तिला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
...............
मुडशिंगीत
एकास मारहाण

कोल्हापूर ः मुडशिंगीत झालेल्या मारहाणीत प्रदीप सुनील जाधव (वय २२, रा. उचगाव) जखमी झाला. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT