कोल्हापूर

वडाचे झाड कोसळले

CD

95011, 95012

...
ऋणमुक्तेश्‍वर मंदिरासमोरील
वडाचे झाड कोसळले
दोन दुचाकी, एक मालवाहू रिक्षासह तीन दुकानगाळ्यांचे नुकसान
कोल्हापूर, ता. ५ ः गंगावेशमधील ऋणमुक्तेश्‍वर मंदिरासमोरील वडाचे मोठे झाड आज सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळले. त्याखाली सापडलेल्या दोन दुचाकी, एक मालवाहू रिक्षाबरोबरसह शेजारील तीन दुकानगाळ्यांचे अंदाजे दोन लाखांवर नुकसान झाले. भाजी मंडई भरण्यापूर्वी तसेच शाहू उद्यानाच्या बाजूला झाड पडल्याने मोठा अनर्थ टळला.
ऋणमुक्तेश्‍वर मंदिरासमोरील शाहू उद्यानालगत असलेल्या वडाच्या झाडाचा आवाज येत होता. त्यामुळे परिसरातील नागरिक दक्ष असायचे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास झाडाचा आवाज येऊ लागल्याने तेथील नागरिक बाजूला पळून गेले. मोठा आवाज करत झाड उद्यानाच्या बाजूला असलेल्या दुकानगाळ्यांच्या बाजूला पडले. मोठे झाड असल्याने त्याच्या दूरवर पसरलेल्या फांद्या शेजारील शेडमधील तीन दुकानगाळ्यांपर्यंत गेल्या. त्या दुकानांचे शेड, त्यांच्यासमोर भाजीपाल्याच्या लावलेल्या हातगाड्या, क्रेट खाली सापडले. तसेच दोन दुचाकी व एक मालवाहू रिक्षावर मोठ्या फांद्या पडल्याने त्यांचे नुकसान झाले. याशिवाय तेथील अनेक दुचाकींवर फांद्या पडल्या. पण त्यांचे फारसे नुकसान झाले नाही. अर्जुन बिरांजे, वैभव बिरांजे यांच्या दुचाकींचे तर नीलेश रंकाळे यांच्या मालवाहू रिक्षाचे नुकसान झाले. इरफान बागवान, सुनील आडसुळे, श्रीनिवास भोसले यांच्या गाळ्याचे तसेच भाजीपाल्याच्या साहित्याचे नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. स्टेशन अधिकारी कांता बांदेकर, अमोल शिंदे, भगवान शिंगाडे, शंतनू डकरे, विशांत चव्हाण यांनी झाडांच्या फांद्या तोडल्या. त्याखाली अडकलेली वाहने बाजूला काढण्यात आली. मोठ्या अवजड फांद्या जेसीबीद्वारे काढण्यात आल्या. विजेच्या तारा तुटल्या होत्या. त्यामुळे महावितरणचे कर्मचारीही तातडीने हजर झाले. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फांद्या बाजूला करण्यास मदत केली.
...
मंडई भरली असती तर...
सकाळी साडेसातच्या सुमारास शेतकरी तसेच विक्रेते भाजी मंडईत येत होते. त्यामुळे मंडई भरली नव्हती. झाड पडले त्याबाजूच्या रस्त्यावरच अनेक विक्रेते, शेतकरी बसतात. मंडई भरली असती तर त्यांच्या जिवाला धोका झाला असता. तसेच ते झाड उद्यानाच्या बाजूला पडल्यानेही नुकसान कमी झाले. ते समोरील बाजूला पडले असते तर तेथील घरांचे नुकसान झाले असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT