कोल्हापूर

दिंडी चालली, विठ्ठलाच्या दर्शनाला

CD

आषाढ मासारंभ विशेष... लोगो
...

दिंडी चालली, विठ्ठलाच्या दर्शनाला...!
रोज पंचवीस-तीस किलोमीटरचा प्रवास : आजपासून जिल्ह्यातील दिंड्यांचे प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम...’च्या अखंड गजरात आजपासून बेळगाव, निपाणीसह सीमा भागातील पायी दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून उद्या (शनिवार) पासून दिंड्या बाहेर पडणार आहेत.
दरम्यान, दररोज किमान २५ ते तीस किलोमीटरचा पायी प्रवास करीत ही मंडळी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरात पोचणार आहेत. शहरातील मोठी परंपरा असलेल्या उत्तरेश्‍वर दिंडीसह शनिवार मंडप, कसबा बावडा येथील दिंड्यांचे प्रस्थान मंगळवारी (ता. ९) होणार आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून निघणाऱ्या पंढरपूर पायी वारीला तीनशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. येवती, निगवे खालसा, मरळी, चुये, कागल, पिंपळगाव, लिंगनूर, फुलेवाडी, कुंभार मंडप, स्वरूपसंचार, विश्वपंढरी आदी दिंड्यांचे दोन दिवसांत प्रस्थान होणार आहेत.
..
असे असते नियोजन...
जिल्ह्यातील दिंड्या पहिल्या दिवशी २५, दुसऱ्या दिवशी ३२, पुन्हा दोन दिवस २५, नंतर २७ आणि शेवटच्या दिवशी ३२ किलोमीटरचा प्रवास करत पंढरपुरात पोचणार आहेत. यंदाच्या दिंड्यांच्या मार्गावर जिल्हा प्रशासनातर्फे आरोग्य पथके तैनात असणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT