कोल्हापूर

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

CD

95225
कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनतर्फे विकासवाडी आणि कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत वृक्षारोपण करण्यात आले.

प्रत्येकाने एक रोपटे लावून त्याचे
संवर्धन करावे : अरूंधती महाडिक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन या संस्थेने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या वर्षात क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने किमान एक रोपटे लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या नूतन अध्यक्षा अरूंधती महाडिक यांनी केले.
विकासवाडी आणि कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये आज वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी अरूंधती महाडिक यांची निवड करण्यात आली. यावेळी अरूंधती महाडिक, उपाध्यक्षा डॉ. मिरा कुलकर्णी, सचिव बी. एस. शिंपुकडे, खजानिस अनिरूद्ध तगारे यांच्या हस्ते विकासवाडी परिसरात विविध देशी वृक्षांची रोपे लावण्यात आली. यावेळी करूणाकर नायक, दीपक मिरजे, डॉ. रमेश खटाबर यांनीही मनोगत व्यक्त केले. शरद पाटील, रितू वायचळ, भारती नायक, राज शेख, सचिन लाड, जगदीश चव्हाण, राजू घोरपडे, रोटरॅक्टच्या अध्यक्षा प्रेरणा जाधव, सचिव अनुष्का शिंदे, तसेच उपसचिव पटेल उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT