कोल्हापूर

सीपीआर मेडीकल वेस्ट

CD

‘डीएम’ला महापालिकेकडून ५० हजारांचा दंड
‘सीपीआर’ची पाहणी ः जैववैद्यकीय कचऱ्याच्या उठवात हयगय केल्याचा ठपका


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः येथील ‘सीपीआर’मधील डी. एम. एंटरप्रायजेस या पुण्याच्या कंपनीने उघड्यावर जैववैद्यकीय कचरा टाकल्याचा ठपका ठेवत महापालिकेने त्यांना ५० हजारांचा दंड केला. महापालिकेच्या आरोग्य पथकाने आज अचानक सीपीआरमधील स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी पथकाला रुग्णालयाच्या आवारात जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याचे दिसले. त्यानुसार कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त कृष्णा पाटील, आरोग्य निरीक्षक मनोज लोट, ऋषिकेश सरनाईक, नंदकुमार पाटील व कर्मचाऱ्यांच्या पथकाने स्वच्छतेची पाहणी केली.
सीपीआरमध्ये संकलित होणारा दैनंदिन कचरा महापालिकेमार्फत वेळोवेळी उठाव केला जातो. येथील जैववैद्यकीय कचरा पर्यावरण संरक्षण अधिनियम, तसेच केंद्रीय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार संबंधित कंपनी व रुग्णालय व्यवस्थापनाने कचरा व्यवस्थापन संकलन व वाहतूक प्रक्रिया आणि निर्मूलन करायचा आहे. वैद्यकीय कचरा निर्मूलनासाठी महापालिका आणि मेसर्स एस. एस. सर्व्हिसेसकडून सामुदायिक जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प चालवला जातो. त्यामुळे रुग्णालयात निर्माण होणारा सर्व जैववैद्यकीय कचरा कलर कोडिंगप्रमाणे वर्गीकरण करून तो डी. एम. कंपनीने बांधून देणे अपेक्षित आहे. सीपीआरने जैववैद्यकीय कचरा त्यांनी स्वतःच्या वाहनांद्वारे नेऊन नष्ट करण्यासाठी एस. एस. सर्व्हिसेसकडे द्यायचा आहे. सीपीआरने या सर्व कामासाठी त्यांच्या अखत्यारित पुणे येथील डी. एम. सर्व्हिसेसची नियुक्ती केली आहे. कचरा उठावात हयगय केल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता विभागाने डी. एम. कंपनीला प्राथमिक कारवाई म्हणून रुपये ५० हजाराचा दंड ठोठावला. यावेळी कंपनीने त्यांच्या बेशिस्त व बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करत असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT