कोल्हापूर

शेअर मार्केट फसवणूक ः क्लास चालकाच्या घरातून लॅपटॉप, कागदपत्रे जप्त

CD

लोगो ः शेअर मार्केट फसवणूक

क्लास चालकाच्या घरातून
लॅपटॉप, कागदपत्रे जप्त

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः शेअर मार्केट गुंतवणुकीवर जादा परताव्याच्या आमिषाने ५९ लाख ५० हजारांची फसवणूक करणाऱ्या विनोद सुधाकर घोटुळे (वय ४०, रा. मीराभक्ती अपार्टमेंट, रंकाळा) याला ५ दिवसांची कोठडी सुनावली आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी शनिवारी त्याच्या घराची झडती घेत लॅपटॉप, एटीएम कार्डे, चेकबुक अशा साहित्यासह कागदपत्रे जप्त केली.
बाबूजमाल तालीम परिसरात शेअर मार्केट क्लासेस चालविणाऱ्या घोटूळे याने क्लासच्या माध्यमातून अनेक विद्यार्थांना तसेच शहरातील अनेकांना शेअर मार्केटमध्ये इन्ट्रा डे, फ्युचर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीतून परताव्याचे आमिष दाखवले होते. सप्टेंबर २०२२ पासून त्याने अनेकांकडून पैसे घेतले. पण, परतावा देणे बंद केल्याने गुंतवणूकदारांनी तगादा सुरू केला होता.

चौकट
अनेकांना कोरे धनादेश देऊन बोळवण
पैसे परत करण्यात अडचणी आल्याने गुंतवणूकदारांना विश्वास वाटावा म्हणून घोटूळे याने एका वकिलाकडून नोटरीद्वारे पैसे परत करणार असल्याचे लेखी दिले होते. तसेच अनेकांना कोरे धनादेशही दिले होते. पण, धनादेश वटत नसल्याने तक्रारदारांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी त्याने दिलेल्या धनादेशांची माहिती एकत्रित करण्यास सुरूवात केली आहे. तसेच त्याच्या लॅपटॉपमधील महत्त्‍व‍वपूर्ण माहितीचीही पडताळणी करण्यात येत आली. पोलिस निरीक्षक दिलीप पवार तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT