कोल्हापूर

गोपालक मालिका भाग २

CD

मालिका लोगोः २
...
95633, ...
...
आरोग्याची हमी, उत्पादन खर्चही कमी
देशी गाय आधारित सेंद्रिय शेती फायद्याची : मातीचा पोत, पिकांची गुणवत्ताही सुधारते
ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : देशी गाय आधारित सेंद्रिय शेती केल्याने उत्पादन खर्च कमी होतो. तसेच मातीचा पोतही सुधारतो. पर्यायाने पिकांची गुणवत्ता सुधारते. त्यामुळेच शेतकरी देशी गाय आधारीत सेंद्रिय शेती करण्याकडे वळत आहेत. शिरोळ तालुक्यातील आक्किवाट येथील सौरभ पाटील यांनी सेंद्रिय शेती करून एक उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. तर नरंदे गावातील विनोद देसाई हे सेंद्रिय गूळ बनवतात. बाजारपेठेतील वाढती मागणी या गुळाच्या गुणवत्तेला पोचपावती देणारी आहे.
शेतीमधील रासायनिक खतांच्या आणि कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे जमीन, मानवी आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात आले आहे. याशिवाय रासायनिक खतांमुळे शेतीचा उत्पादन खर्चही वाढतो. त्यामुळे शेतीचे आर्थिक गणित कोलमडते. या सगळ्यांचा विचार करून सौरभ पाटील या तरुणाने बँकेतील नोकरीची संधी सोडून सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. २०१९ पासून तो सेंद्रिय शेती करीत आहे. त्यांच्याकडे चार देशी गायी आहेत. या गायींच्या पंचगव्यापासून ते जीवांमृत, गोकृपांमृत अशा प्रकारची सेंद्रिय कीटकनाशके, खते बनवतात. गांडूळ खताचा उपयोग करतात. त्यातून वर्मीवॉश बनवतात. या खतांचा वापर केल्याने जमिनीचा पोत सुधारतो. मातीची जलधारणक्षमता वाढते. हे सगळे सकारात्मक बदल सौरभ यांनी अनुभवले आहेत. घरासाठी लागणारा भाजीपालादेखील ते शेतामध्ये करतात. त्यामुळे कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहते.
नरंदे येथील विनोद देसाई यांनी सेंद्रिय गूळ बवला आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते हा गूळ बनवतात. यासाठी त्यांनी प्रथम सेंद्रिय ऊस शेतामध्ये केला. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढावे, यासाठी त्यांनी नैसर्गिक शेतीचा मार्ग अवलंबला. सेंद्रिय उसापासून त्यांनी सेंद्रिय गूळ बनवला आहे. एक किलो, पाच किलो आणि पाच ग्रॅम या आकारात हा गूळ उपलब्ध आहे. तसेच गुळाची पावडरही ते बनवतात. रासायनिक गुळापेक्षा त्यांना दीडपट अधिक दर मिळतो. या गुळाची गुणवत्ता पाहून ग्राहकांची मागणीही वाढली आहे. पूर्वी बाजारपेठेत व्यापारी सेंद्रिय गुळाला फारसा प्रतिसाद देत नव्हते. मात्र, आता मागणी वाढल्याने त्यांना देखील सेंद्रिय गूळ विकण्याचे प्रमाण वाढवले आहे.
...
सेंद्रिय शेतीची चळवळ
सौरभ पाटील आणि विनोद देसाई हे देशी गाय आधारित सेंद्रिय शेतीचा प्रचार प्रसार करतात. यासाठी ते शेतकऱ्यांचे प्रबोधन करतात. त्यांना माहिती आणि प्रशिक्षणही देतात. त्यामुळे सेंद्रिय शेती करणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT