कोल्हापूर

डंबर धडक दोघे जखमी

CD

95705

डंपरच्या धडकेत
दुचाकीवरील दोघे जखमी

जयंती नाल्याजवळील घटना

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः कसबा बावडा येथील कार्यक्रमानंतर दुपारी घरी जाताना जयंती नाल्यावरील पुलाजवळ डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाले. वैशाली दिलीप शिंदे (वय ४३, रा. सातार्डे, ता. पन्हाळा) आणि भाचा संतोष सरदार झेंडे (वय २४, रा. पडळ, ता. पन्हाळा) अशी जखमींची नावे आहेत. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. डंपर चालक परशुराम मल्लाप्पा पाटील (वय ४४, रा. सुभाषनगर) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे लक्ष्मीपुरी पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेचा डंपर घेऊन चालक पाटील हे कसबा बावडा येथील कचरा प्रक्रिया केंद्रात कचरा टाकण्यासाठी गेले होते. तेथे कचरा टाकून ते परत लक्ष्मीपुरीतील कार्यालयाकडे येत होते. याचवेळी वैशाली भाच्याच्या दुचाकीवरून शहरात येत असतानाच त्यांची दुचाकी जयंती नाल्याजवळ जुन्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेजवळ डंपरच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली सापडली. त्यामुळे साधारण १० ते १५ फूट दुचाकी फरफटत पुढे गेली. चालक पाटील यांना अपघात झाल्याची माहिती मिळताच त्यांनी प्रसंगावधान राखून डंपर थांबवला. त्यामुळे दुचाकीवरील दोघे किरकोळ जखमी झाले. यात दुचाकीवर मागे बसलेल्या वैशाली शिंदे याच्या पायाला दुखपत झाली. तसेच भाचा झेंडे किरकोळ जखमी झाला. स्थानिक आणि पोलिसांकडून जखमींना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. सुदैवानेच दोघे बचावल्याचीही चर्चा स्थानिकांत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT