कोल्हापूर

घरफाळ्यातील सवलतीसाठी मिळकतधारक सरसावले

CD

घरफाळ्यातील सवलतीसाठी मिळकतधारक सरसावले
इचलकरंजी महापालिका ः जुलैच्या पहिल्या आठवड्यात १७७५ जणांनी घेतला लाभ
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ८ ः महापालिकेने दिलेल्या मुदतवाढीमुळे १० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी मिळकतधारक सरसावले आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तब्बल १७७५ मिळकतधारकांनी घरफाळ्यातील दुसऱ्या सहामाहीतील संयुक्त करात १० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. या सवलतीची अंतिम मुदत १५ जुलै आहे. तर दुसरीकडे मिळकतधारकांना घरफाळा बिले वेळेत मिळण्यासाठी कर विभागाकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन दिवसांत १०० टक्के घरफाळा बिलांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत सवलतीचा लाभ घेण्यासाठी मिळकतधारकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
महापालिका झाल्यानंतर प्रथमच दोन टप्प्यांत घरफाळा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घरफाळा भरण्यासाठी महापालिकेने दुसऱ्या सहामाहीतील संयुक्त करात १० टक्के सवलत जाहीर केली आहे. वास्तविक एकूण वार्षिक संयुक्त करात फक्त ५ टक्के सवलत आहे. दोन्ही सहामाहीतील घरफाळा भरल्यास ही सवलत लागू केली आहे. त्यामुळे नागरिक याचा लाभ घेण्यासाठी घरफाळा भरण्यासाठी आतापासूनच गर्दी करीत आहेत. यापूर्वी ३० जून ही सवलत घेण्याची मुदत होती. मात्र सुमारे ७५ टक्क्यांहून अधिक नागरिकांना घरफाळा बिले हातात मिळाली नव्हती. त्यामुळे त्याचा लाभ घेताना अडचणी निर्माण झाल्या होत्या.
याबाबत राजकीय पक्षांसह मिळकतधारकांनी महापालिका प्रशासनाकडे मुदतवाढीची मागणी केली होती. अखेर महापालिकेने १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार बिलांचे वाटपही युद्धपातळीवर सुरू केले आहे. १० जुलैपर्यंत सर्व बिलांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यानंतर पुढील पाच दिवस १० टक्के सवलतीचा लाभ घेण्यात वेळ मिळणार आहे. या कालावधीत मिळकतधारकांना महापालिकेतील कर विभागासह चार विभागीय कार्यालयांत घरफाळा भरता येणार आहे. यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या सवलतीचा लाभ घेण्यासाठी उर्वरित कालावधीत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
-----
पुढील सवलत फक्त चार टक्के
मिळकतधारकांना १५ जुलैनंतर पुढील पंधरा दिवसांपर्यंत केवळ ४ टक्के सवलत मिळणार आहे. त्यानंतर पुढील पंधरवड्यामध्ये ३ टक्के व ३१ ऑगस्टअखेर २ टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यानंतर मात्र सवलत दिली जाणार नाही.
-------
घरफाळा वसुली दृष्टिक्षेप
मिळकरतधारक संख्या - ५६४३४
एकूण मागणी (थकबाकीसह) - ७१ कोटी ३५ हजार ६६७
आजअखेर वसुली - ८ कोटी २९ लाख ४० हजार ४११
एकूण टक्केवारी - ११.४० टक्के.
---------
७६९४ मिळकतधारकांनी घेतला लाभ
आतापर्यंत ७६९४ मिळकतधारकांनी १० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. त्यानुसार या मिळकतधारकांना एकत्रित २० लाख ७४ हजार २९० हजारांचा लाभ मिळाला आहे. विशेषतः मुदतवाढीनंतर मिळकतधारकांचा घरफाळा भरण्याकडे ओघ वाढला आहे. सुमारे ८० टक्के मिळकतधारकांना घरफाळा बिले मिळाली आहेत. उर्वरित २० टक्के घरफाळा बिले दोन दिवसांत वाटप केली जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT