कोल्हापूर

मुदत वाढवली, गती मंदावली

CD

मुदत वाढवली, गती मंदावली
लाडकी बहीण योजना ः तांत्रिक अडथळ्यांमुळे अॅपद्वारे ऑनलाईन प्रक्रियाही रेंगाळतेय
अजित माद्याळे ः सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी १५ जुलैची मुदत दिल्यानंतर ग्रामपंचायती आणि सुविधा केंद्रांसमोर रांगा लागल्या. दुसऱ्याच दिवशी त्याची मुदत वाढवल्यानंतर लागलीच लाडक्या बहिणींची गती मंदावली आहे. आता आठवडाभरात तालुक्यातून केवळ साडेतीन हजार बहिणींचेच अर्ज प्राप्त झाले असून, ऑनलाईन अॅपच्या सर्व्हरचीही गती संथ झाल्याने डोकेदुखी वाढली आहे.
महिलांसाठी महिन्याला प्रत्येकी दीड हजार रुपये अनुदानाची सरकारने योजना सुरू केली. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला १५ जुलै सांगितली गेली. लागलीच दुसऱ्या दिवसापासून तालुक्याच्या गावागावांतील ग्रामपंचायती, तलाठी कार्यालयांसह शाहू सुविधा, महा ई सेवा, आपले सरकार केंद्रांसमोर दाखल्यांसाठी रांगा लागू लागल्या. ही परिस्थिती शासनापर्यंत गेल्यानंतर तातडीने योजनेच्या लाभासाठी ऑगस्टअखेरची मुदत वाढवली. त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच संबंधित केंद्रात काही मोजक्याच बहिणी दिसू लागल्या. त्यातच अधिवास, उत्पन्न दाखल्याची अट शिथिल केल्याने ग्रामपंचायती व तलाठी कार्यालये गर्दीमुक्त झाली. योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास दोन महिन्यांचा कालावधी मिळाल्याने लाडक्या बहिणी निवांत झाल्या आहेत.
कुटुंबातील एका महिलेसाठी असलेल्या या योजनेची व्याप्ती वाढवून आणखीन एका अविवाहित महिलेलाही लाभ मिळणार आहे. परिणामी लाभार्थ्यांची संख्या वाढण्याचे संकेत आहेत. एका गडहिंग्लज तालुक्यातून साधारणतः ४० ते ५० हजार लाभार्थी होण्याची अपेक्षा अंमलबजावणी यंत्रणेला आहे. आता आठवडाभरात केवळ साडेतीन हजार लाभार्थींचे अर्ज प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. अंगणवाडी सेविका या कागदपत्रांची छाननी करून हे अर्ज ऑनलाईन करीत आहेत.
----------------
आठवड्यात सहाच ऑनलाईन
सुविधा केंद्रे आणि ग्रामपंचायतीमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन शासनाने महिलांना घरबसल्या अर्ज भरता यावे म्हणून अॅप सुरू केले आहे. परंतु अद्याप या अॅपला हवी तितकी गती नाही. अॅपवरील माहिती लवकर भरून होते; परंतु सबमिशन केल्यानंतर लवकर मॅसेज न येणे, पेंडिंगचे प्रमाण वाढण्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी अंगणवाडी सेविकांची डोकेदुखी वाढली आहे. संथ गतीमुळे आठवडाभरात केवळ पाच ते सहा फॉर्म ऑनलाईन झाल्याचे एका अंगणवाडी सेविकेने सांगितले. बहुतांशी महिलांचे अर्ज व कागदपत्रे तयार आहेत. मात्र, सर्व्हर डाउनमुळे ऑनलाईन संथगतीने होत आहे. त्याचाही परिणाम अंमलबजावणीवर दिसून येत आहे.

* दृष्टिक्षेपात आठवड्याचा आढावा
- तालुक्यातून अपेक्षित लाभार्थी ः ४० हजार
- एकूण ऑफलाईन प्राप्त अर्ज ः ३६०५
- पैकी ऑनलाईन केलेले अर्ज ः १४३५
(आकडे ९ जुलैअखेर)
-----------------------------
* ठळक मुद्दे
- अंगणवाडी सेविका करणार कागदपत्रांची पडताळणी
- ऑनलाईन कुठेही करा; पण मूळ अर्ज-कागदपत्रे सेविकांकडेच द्या
- केशरी व पिवळे रेशनकार्डधारकांना उत्पन्न दाखल्याची अट रद्द
- परराज्यातील महिलांना अधिवास दाखला नाही
- वरिष्ठांकडून रोज घेतला जातोय आढावा
----------
लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. अंगणवाडी सेविकांवर अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी आहे. रोज आढावा घेतला जात असून अॅपद्वारे अर्ज ऑनलाईन करण्यास सुरुवातीला संथगती होती. आता त्रुटी दूर झाल्याने अॅप सुरळीत सुरू आहे. यामुळे ऑनलाईन प्रक्रियेलाही गती मिळेल.
- ऋषिकेत शेळके, तहसीलदार गडहिंग्लज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT