कोल्हापूर

खंडपीठासाठी प्रयत्नशील - खासदार शाहू छत्रपती महाराज

CD

फोटो-96008

मुख्यमंत्री, मुख्य न्यायमूर्तींच्या भेटीसाठी प्रयत्न करू
सर्किट बेंचप्रश्‍नी श्रीमंत शाहू छत्रपतींची ग्वाही; बार असोसिएशनकडून सत्कार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्यासोबत लवकरात लवकर भेट घेण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खंडपीठ कृती समिती यांच्या बैठकीचे लवकरच आयोजन व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न करू, असेही जाहीर केले.
बार असोसिएशनतर्फे आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना भेटून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांकरिता खंडपीठ होण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशीही विनंती शिष्टमंडळाने केली. खंडपीठ आणि सर्किट बेंचचा प्रश्न सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, याचीही माहिती असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सर्जेराव खोत यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व मुख्यमंत्री यांची बैठक होणे गरजेचे असल्याची माहिती दिली. यानंतर खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी मुख्यमंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांची भेट होण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
शिष्टमंडळात महादेवराव आडगुळे, शिवाजीराव राणे, रणजित गावडे, अजित मोहिते, आर. एल. चव्हाण, व्ही. आर. पाटील, राजेंद्र मंडलिक, नारायण भांदिगरे आदी ज्येष्ठ वकिलांसह बार असोसिएशनचे सचिव ॲड. निशिकांत पाटोळे, ॲड. राजू ओतारी, ॲड. विजय ताटे - देशमुख, ॲड. संदीप चौगुले, ॲड. अरुण पाटील, ॲड. गुरुदत्त पाटील, ॲड. अमृत राणोजी, ॲड. अनिकेत डोंबे यांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT