कोल्हापूर

पावसाची उघडीप, नदीची पाणी पातळी घटली

CD

पावसाची उघडीप, नदीच्या पातळीत घट
पुराचा धोका कमी ः राधानगरी धरणातून १३०० क्युसेक विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः जिल्ह्यात ४८ तासांपासून पावसाने उघडीप दिली आहे. बहुतांशी भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीतही घट झाली असून, पुराचा धोका कमी झाला आहे. मंगळवारी (ता. ९) सकाळी १० वाजता नदीची पाणी पातळी ३२ फूट ५ इंच होती. सायंकाळी ८ वाजता पाणी पातळी २९ फूट ९ इंच इतकी होती. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्याने एका दिवसात नदीची पाणी पातळी ३ फुटांनी कमी झाली. राधानगरी धरणातून १३०० क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील घाट भागात अतिवृष्टी होईल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. मात्र, घाट क्षेत्रातही पावसाचा जोर फारसा नव्हता. शहरासह जिल्ह्याच्या बहुतांशी भागात तुरळक सरींचा अपवाद वगळता पाऊस पडला नाही. त्यामुळे नदीची पाणी पातळी घटली आहे.

झापाचीवाडी प्रकल्प ८० टक्के भरला
धामोड : गतवर्षी पहिल्यांदाच पाणी साठवण केलेल्या झापाचीवाडी (ता. राधानगरी) येथील लघुपाटबंधारे प्रकल्प ८० टक्के भरला आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवस झालेल्या पावसाने पाणी पातळीत वाढ झाली आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसणाऱ्या म्हासुर्ली परिसरातील पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. ९९० सहस्त्र घनमीटर पाणी साठवण क्षमतेचा हा प्रकल्प असून १०५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. गतवर्षी या प्रकल्पाच्या मुख्य भिंतीच्या दगडी अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने पहिल्यांदाच पाणी साठवण केले होते.

इचलकरंजीत जुना पूल वाहतुकीसाठी बंद
इचलकरंजी ः पावसाने मंगळवारी दिवसभर उघडीप दिली. त्यामुळे पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी अर्ध्या फुटाने खालावली. परिणामी, संभाव्य पुराचा धोका तूर्त टळला आहे. मात्र, जुना पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. आणखी दोन फूट पाणी उतरल्यानंतर हा पूल वाहतुकीस खुला करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. सायंकाळी ५७ फुटांवर पाणी होते.

धरणातील पाणीसाठा (आकडे टी.एम.सी. मध्ये)
राधानगरी*३.९७
तुळशी*१.७५
वारणा*१७.२९
दूधगंगा*८.६६
कासारी*१.२५
कडवी*१.६९
कुंभी*१.१४
पाटगाव*२.३७
चिकोत्रा *०.५२
चित्री*१.०६
जंगमहट्टी*०.९७
घटप्रभा - १.५६
जांबरे*०.८२
आंबेआहोळ*१.००
सर्फनाला *०.२७
कोदे लघु प्रकल्प*०.२१
आलमट्टी*७१.३९१
कोयना*३१.६७
हिपरग्गी*२.३६.
------
चौकट
जिल्ह्यात ५१ बंधारे पाण्याखाली
शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, चिंचोली, शिरगाव, हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली व बाजारभोगाव, पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी, साळगांव व निलजी, कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकर, न्हावेली, कोवाड व उमगाव, दत्तवाड व सिध्दनेर्ली, बीड, सुळे, पनोरे, आंबर्डे व गवशी, कळे व शेनवडे, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी व म्हसवे असे ५१ बंधारे पाण्याखाली आहेत.
------------------------------------------
चौकट
भूस्खलन धोक्यामुळे स्थलांतराची नोटीस
घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला होता. त्यामुळे या भागातील भूस्खलनाचा धोका असणाऱ्या गावातील नागरिकांना प्रशासनाने स्थालांतर करण्याची नोटीस दिली. राधानगरी आणि गगनबावडा या तालुक्यांतील लोकांना नोटीस दिली होती. बोरावले आणि ऐनी पैकी धरमलेवाडी या गावांना स्थलांतर करण्यास सांगण्यात आले होते.
---------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT