कोल्हापूर

शेतकऱ्यांस उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती

CD

ich92.jpg
96026
इचलकरंजी : डीकेटीईमध्ये एआय विभागात बनविण्यात आलेल्या शेतीसाठी उपयुक्त सॉफ्टवेअरसोबत विद्यार्थी व मार्गदर्शक.

शेतकऱ्यांस उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती
डीकेटीईतील विद्यार्थ्यांचे यश : मातीच्या परीक्षणातून पीक घेण्यास मदत
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० : येथील डीकेटीईच्या अर्टिफिशियल इंटेलीजन्स इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी मृणाली कांदेकर, प्रतीक खंदारे, अथर्व अंकलखोपे आणि योगेश कल्याणी यांनी ‘मातीचे परीक्षण करून त्यातील घटक ओळखता येतील’ यावर आधारित शेतकऱ्यांना उपयुक्त असे सॉफ्टवेअर बनवले आहे. प्रा. सौ. डी. एम. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे.
सॉफटवेअरमुळे मातीतील पोटॅशियम, फॉस्फरस, नायट्रोजन यांचे प्रमाण किती आहे, हे ओळखून मातीचा पीएच चेक करता येतो. त्यामुळे कोणकोणती विविध उत्पादने घेता येतील, याचा अंदाज बांधण्यास शेतकऱ्यांना मदत होऊन योग्य तो निर्णय घेणे सोपे होते. मातीतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करता येतो. मातीतील घटकांची माहिती शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे त्या-त्या घटकाला उपयुक्त अशी पिके घेण्यास शेतकऱ्यांना मदत होणार असून, त्यांच्या वेळेची व पैशांची बचत होईल.
संस्थेच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी प्रोजेक्ट निवडताना प्राधान्याने लोकांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी समजावून घेऊन त्यावर तंत्रज्ञानाच्या सहायाने समाधानकारक उपाययोजना तयार करण्याचा प्रयत्न करतात, असे मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी सांगितले. संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे आदींनी शुभेच्छा दिल्या. त्यांना संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ. एस. के. शिरगावे यांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT